पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार

1. व्दिपकल्प –

एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

2. भूशीर –

व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

3. खंडांतर्गत समुद्र –

मध्यभागी समुद्रभोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

4.बेट –

एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

5. समुद्रधुनी –

काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो.

ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

6. संयोगभूमी –

दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

7.आखात –

उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

8. खाडी –

आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

9. समुद्र किंवा सागर –

महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात.
सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

10. उपसागर –

खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात.

उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो.

उदा. बंगालचा उपसागर

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.