बॉम्बे असोसिएशन
बॉम्बे असोसिएशन

बॉम्बे असोसिएशनची स्थापना

26 ऑगस्ट 1852 रोजी एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत “बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंग्रजी वृत्तपत्रे “बॉम्बे गॅझेट” व “टेलिग्राफ अॅन्ड कुरियर” या वृत्तपत्रांनी बॉम्बे असोसिएशनवर जोरदार टीका केली या टीकेमुळे

  • जमोटजी जिजीभाई,
  • महंमद अमीन,
  • माणिकजी कर्सेटजी

यांनी संघटना सोडण्याचा निर्णय घेतला.

४ मार्च १८५३ रोजी संघटनेच्यावतीने तीन हजार लोकांच्या सह्या असलेला एक मागणी अर्ज इंग्लडंच्या पार्लमेंटला सादर केला.
ब्रिटीश पार्लमेंटच्या  दोन्ही सभागृहात असोसिएशनच्या मागणी अर्जाची दखल घेण्यात आली.
परिणामी संसदेने त्यावर भारतातील राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक खास समिती नेमली. 

बॉम्बे असोसिएशनची कार्ये

इ.स. १८५५ मध्ये मुंबई सरकारने दोन कोटी रुपयांचे कर्ज उभारले.

पाच टक्के व्याजदराने उभारलेले हे कर्ज रस्ते, कालवे, पाटबंधारे वगैरे  बांधकामासाठी होते पण त्या कर्जाचा उपयोग ब्रम्ही युद्धासाठी करण्यात आला. या बद्दल असोसिएशनने सरकारला जाब विचारला.

कायदेमंडळात जी विधेयके येतात ती जनतेच्या प्रतिक्रियेसाठी देशी भाषेत मांडावीत ही असोसिएशनची भूमिका सरकारला मान्य करावी लागली.

कोर्टातील स्टॅप ड्युटीबाबत शहर व गावात भेदभाव केला जात होता तो असोसिएशनच्या हस्तक्षेपामुळे थांबला.

महाराष्ट्रातील काही महत्त्वाचा रेल्वेमार्गासंबंधी असोसिएशनने सरकारला मार्गदर्शन केले.

मुंबई हायकोर्टात हिंदी लोकांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली जावी असा आग्रह असोसिएशनने धरला

नाना शंकरशेठ यांचा इस १८६५ मध्ये मृत्यु झाला त्यांच्या मृत्युमुळे बॉम्बे असोसिएशनचे कामकाज थंडावले. 

इ.स. 1867 मध्ये या संस्थेच्या कामाला पुन्हा चेतना देण्यासाठी प्रय्न सुरु हाले पण त्यात यथ आले नाही. 

कालांतराने विश्वनाथ नारायण मंडलीक, फिरोजशहा मेहता काशिनाथ त्र्यंबक तेलंग,  बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या सारख्या नेत्यांनी या संस्थेचे रूपांतर बॉम्बे प्रेसीडेंसी असोसिएशन या संस्थेत केले. 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.