admin
 • 0

कोणत्या प्रक्रियेत, स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूरूप पदार्थात रूपांतर होते ?

 • 0

कोणत्या प्रक्रियेत, स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूरूप पदार्थात रूपांतर होते ?

1) घनीकरण (Solidification)
2) द्रवीकरण (Liquidification)
3) वाष्पीभवन (Evaporation )
4) संप्लवन (Sublimation)

Related Questions

 1. योग्य उत्तर आहे: संप्लवन (Sublimation)

  • 0
 2. पदार्थाचे स्थायुरूपातून थेट वायुरूपात रुपांतर होण्याच्या प्रक्रियेला संप्लवन असे म्हणतात.

  संप्लवन : घन पदार्थ वायू किंवा बाष्प अवस्थेत सरळ रूपांतरित होण्याच्या क्रियेला संप्लवन म्हणतात. घन व वायू यांच्या मधली द्रव   अवस्था निर्माण न होणे हे या भौतिक प्रक्रियेचे वैशिष्टय आहे. आयोडीन, आर्सेनिक, शुष्क बर्फ (घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड), नवसागर, कापूर अशा प्रकारच्या काही पदार्थांचे प्रथम न वितळता (द्रवरूप न होता) वायु-रूपात किंवा बाष्परूपात रूपांतरण होते. या प्रक्रियेचा उपयोग शुद्ध पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी होतो.

  प्रत्येक पदार्थाला थोडा तरी बाष्पदाब असतो व तो तापमानाबरोबर वाढतो. हा परस्परसंबंध संप्लवन आलेखाने दर्शविला जातो. पदार्थाचे घन-स्थितीतून वायुस्थितीत रूपांतर होत असताना त्याने शोषून घेतलेल्या उष्ण-तेस संप्लवनाची सुप्त उष्णता म्हणतात. पदार्थाच्या घनस्थिती व वायुस्थिती यांमधील या समतोलास क्लॉसियस-क्लॅपिरॉन समीकरण लागू पडते. ते समीकरण पुढे दिले आहे.

  • 0
Leave an answer

Leave an answer

Browse