Below is the raw extracted text layer indexed from the official PDF for search accessibility, screen readers, and quick question search.
Maharashtra Public Service Commission Assessment
Duration :
Number of Questions :
Total Marks :
Display Marks:
Assistant Professor Group A in Marathi and Lecturer Group B in
Marathi Combined Screening Test
60
100
200
Yes
Maximum Instruction Time :
Is Section Default? :
0
No
Subject Name :
Question Number : 1 Question Id : 4410092480842 Question Type : MCQ
‘भाषा’ म्हणजे काय ? भाषेची खालीलपैकी कोणती व्याख्या योग्य आहे ?
Options :
1. समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये घडू न येणारी संकु चित देवाणघेवाण म्हणजे भाषा.
2. दळणवळणासाठी आवश्यक अशी देहबोली, एकमेव ‘नैसर्गिक शारीरिक क्रिया’ म्हणजे भाषा होय.
3. यादृच्छिक ध्वनिसंके तावर आधारलेली, समाजव्यवहाराला साह्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा.
4. व्यक्तीशी आत्मीयतेचे संबंध प्रस्थापित करणारी, मर्यादित क्षमता असलेली व्यवस्था म्हणजे भाषा.
Question Number : 2 Question Id : 4410092480883 Question Type : MCQ
‘अभिव्यक्ती’ आणि ‘आशय’ हे दोन्हीही भाषेचे दोन आधार मानले जातात. त्यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
Options :
1. ते एकमेकांशी घनिष्ट संबंधित असून थोडेसे परस्परपूरक आणि परस्परावलंबी देखील आहेत.
2. ते एकमेकांशी घनिष्ट संबंधित नसून देखील परस्परपूरक आणि परस्परावलंबी आहेत.
3. ते एकमेकांशी घनिष्ट संबंधित असून परस्परपूरक आणि परस्परावलंबी अजिबात नाहीत.
4. ते एकमेकांशी घनिष्ट संबंधित तर नाहीतच पण परस्परपूरक आणि परस्परावलंबी असू शकतात.
Question Number : 3 Question Id : 4410092456398 Question Type : MCQ
खालीलपैकी 'कर्तरी प्रयोग' असलेले वाक्य कोणते?
Options :
1. रामाने आंबा खाल्ला.
2. तो म्हैस बांधतो.
3. शिपायाकडू न चोर पकडला गेला.
4. त्याने आता घरी जावे.
Question Number : 4 Question Id : 4410092148985 Question Type : MCQ
खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
Options :
1. महेशने पोवाडा म्हटला.
2. तुम्ही आता यावे.
3. शालिनी के र काढते.
4. मुले लवकर घरी गेली.
Question Number : 5 Question Id : 4410092487365 Question Type : MCQ
‘तू सवाष्णींना हळदीकुं कू दे’ या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययान्त शब्दाचा कारकार्थ ओळखा.
Options :
1. अधिकरण
2. करण
3. संप्रदान
4. अपादान
Question Number : 6 Question Id : 4410092488601 Question Type : MCQ
खाली दिलेल्या गटातून ‘सप्तमी विभक्ती प्रतिरूपक अव्यये’ म्हणून कार्ये करणाऱ्या अव्ययांचा गट निवडा.
Options :
1. कडे, प्रीत्यर्थ, बद्दल, स्तव
2. विषयी, भोवती, समोर
3. संबंधी, विषयी
4. योगे, प्रणे, सह, वतीने
Question Number : 7 Question Id : 4410092481644 Question Type : MCQ
कोंकणी बोलीभाषेबद्दल योग्य माहिती देणारा पर्याय निवडा.
Options :
1. भारताच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-पोर्तुगीज भाषा आहे.
2. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे.
3. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई पट्ट्यात बोलली जाणारी एक आशियाई-अरे बिक भाषा आहे.
4. भारताच्या पश्चिमघाट किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक द्राविडी कु ळातील भाषा आहे.
Question Number : 8 Question Id : 4410092481114 Question Type : MCQ
बोलीभाषा अहिराणीत कोणती व्यंजने नाहीत?
Options :
1. ब आणि भ
2. छ आणि ण
3. च आणि झ
4. ल आणि श
Question Number : 9 Question Id : 4410092482051 Question Type : MCQ
तावडी बोलीचे वैशिष्ट्य नमूद करा.
Options :
1. जास्तीत जास्त शब्दात जास्तीत जास्त आशयघन भावना व्यक्त करण्याकडे कल आहे.
2. अगदी मोजक्या शब्दात मोजकाच आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे.
3. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे.
4. कमीत कमी व्यंजने आणि जास्तीत जास्त स्वर वापरून आशय व्यक्त करण्याकडे कल आहे.
Question Number : 10 Question Id : 4410092482244 Question Type : MCQ
'मावची' बोली बोलणारे लोक कोणता व्यवसाय करतात आणि कोणत्या परं परा पाळतात ?
Options :
1. ते मासेमारी करतात, त्यातील बहुतेक कोळी धर्मीय असून कोळ्यांच्या परं परांचे पालन करतात.
2. ते मेंढपाळी करतात,त्यातील अनेक पशुपालक असून ग्रामीण परं परांचे पालन करतात.
3. ते शेती करतात,त्यातील अनेक ख्रिश्चन धर्मीय असून आदिवासी परं परांचे पालन करतात.
4. ते शिकार करतात, त्यातील अनेक भिल्ल असून भिल्ल परं परांचे पालन करतात.
Question Number : 11 Question Id : 4410092485167 Question Type : MCQ
योग्य पर्याय निवडा - प्रस्तरांवर कोरून लिहिण्याचा प्रघात होता, ज्यामुळे ------Options :
1. पारं परिक सांस्कृ तिक माहितीचा ठे वा ताडपत्रांद्वारे एका पिढीकडू न पुढच्या पिढीकडे सोपविला जायचा.
2. पारं परिक सांस्कृ तिक माहितीचा ठे वा शिलालेखांद्वारे एका पिढीकडू न पुढच्या पिढीकडे सोपविला जायचा.
3. पारं परिक सांस्कृ तिक माहितीचा ठे वा ताम्रपटाद्वारे एका पिढीकडू न पुढच्या पिढीकडे सोपविला जायचा.
4. पारं परिक सांस्कृ तिक माहितीचा ठे वा भूजपत्राद्वारे एका पिढीकडू न पुढच्या पिढीकडे सोपविला जायचा.
Question Number : 12 Question Id : 4410092480880 Question Type : MCQ
निरूपण म्हणजे ---------------------------. योग्य पर्याय निवडा.
Options :
1. एखाद्या क्लिष्ट नाटकाचा किं वा नाट्यप्रयोगाचा गूढ अर्थ, त्याच्या स्वरूपासह सोप्या भाषेत, अभिनयासह उलगडू न दाखविणे.
2. एखाद्या क्लिष्ट गोष्टीचा किं वा श्लोकाचा गूढ अर्थ, त्याच्या स्वरूपासह , लक्षणांसह सोप्या भाषेत , उदाहरणासह उलगडू न दाखविणे.
3. सोप्या गोष्टीचा किं वा श्लोकाचा सोपा अर्थ, त्याच्या स्वरूपासह , लक्षणांसह अधिक गूढ भाषेत , उदाहरणासह उलगडू न दाखविणे.
4. एखाद्या विचित्र गोष्टीचा किं वा गूढ गोष्टीचा मतितार्थ, काव्यात्मक स्वरूपासह , तरल लक्षणांसह लवचिक भाषेत उलगडू न दाखविणे.
Question Number : 13 Question Id : 4410092486761 Question Type : MCQ
कीर्तन म्हणजे काय ? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Options :
1. वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर के लेले भक्तिरसपूर्ण कथारूप, अनेक पात्रे असलेले निवेदन.
2. वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर के लेले भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदन.
3. काव्य, संगीत, अभिनय आणि नृत्य यांच्यासह सामाजिक आणि सांसारिक प्रश्नांवर सामूहिक नाट्यप्रवेश सादरीकरण म्हणजे कीर्तन .
4. वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह वीररसपूर्ण कथारूप एकपात्री मूकाभिनय म्हणजे 'कीर्तन'.
Question Number : 14 Question Id : 4410092486576 Question Type : MCQ
माणसाच्या भाषिक कौशल्य विकासासाठी अत्यावश्यक असणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणजे ‘श्रवण कौशल्य’. त्याची खालीलपैकी कु ठली व्याख्या योग्य आहे
ते लिहा.
Options :
1. कु ठलेही संभाषण समजून घेण्यासाठी जी मानसिक तयारी लागते ती करणे किं वा तशी स्थिती निर्माण करणे म्हणजे श्रवण कौशल्य.
2. वाचन करताना लिहिलेल्या गोष्टी मनाच्या जाणिवांच्या पातळीवर अनुभवणे व अनुसरून प्रतिसाद देण्याची कु वत म्हणजे श्रवण कौशल्य.
3. मौखिक संभाषण समजून घेण्याची व त्याला अनुसरून परिणामकारक प्रतिसाद देण्याची कु वत ज्यामुळे निर्माण होते ते श्रवण कौशल्य.
4. लिपीचे स्वरूप समजून घेण्याची व त्याला अनुसरून परिणामकारक प्रतिसाद देण्याची कु वत ज्यामुळे निर्माण होते ते श्रवण कौशल्य.
Question Number : 15 Question Id : 4410092485155 Question Type : MCQ
खालील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा. प्रसिद्ध भावगीतकार कण्णदासन् हे ‘प्रज्ञै’ व ’कन्नदासन्’ या नियतकालिकांचे संस्थापक असून या
नियतकालिकांमधून ---------------------------------------------------------------.
Options :
1. आधुनिक जग आणि देशोदेशीच्या संस्कृ ती यां मुद्द्यांना चालना देण्यात आली.
2. आधुनिक काव्य, लघुकथा आणि समीक्षा इत्यादींना चालना देण्यात आली.
3. आधुनिक पिढी, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या साहित्याला चालना देण्यात आली.
4. ऐतिहासिक घडामोडींवर भाष्य आणि त्यांच्या चर्चा इत्यादींना चालना देण्यात आली.
Question Number : 16 Question Id : 4410092484978 Question Type : MCQ
मराठीतील एक वृत्तपत्र ‘प्रभाकर‘ हे १८४१ मध्ये सुरु झाले. त्याची विशेषता काय होती ?
Options :
1. ‘प्रभाकर’ वृत्तपत्र १८४१ साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरु के ले.
2. ‘प्रभाकर’ वृत्तपत्रापासून पुण्यातील वृत्तपत्र व्यवसायाला व पत्रकारितेला खऱ्या अर्थाने प्रारं भ झाला.
3. ‘प्रभाकर’ मध्ये प्रसिध्द झालेली शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी लिहीत असत.
4. अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी ‘प्रभाकर’ वृत्तपत्र मुंबईतून दैनिकरुपात सुरु के ले.
Question Number : 17 Question Id : 4410092488402 Question Type : MCQ
सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ ‘चार्ल्स हॉके ट’ यांच्या ‘A Course in Modern Linguistics’ या पुस्तकामध्ये भाषेसंबंधीच्या वैविध्यपूर्ण अभ्यासासह खालीलपैकी अजून
कोणत्या गोष्टीचा अभ्यास के लेला दिसतो?
Options :
1. अनेक भाषातज्ञांच्या पुस्तकांविषयी, सहभागाविषयी सखोल चर्चा, त्या पुस्तकांचे साहित्यिक मूल्य आणि त्यांच्यातील सैद्धांतिक भेदाभेदांचा अभ्यास.
2. मानवाची आणि अनेक मानवेतर प्राण्यांची विचार-विकारांची, हावभावादी अभिव्यक्ती / दळणवळणाची पद्धती यातील फरकाचा अभ्यास.
3. मानवाचे भाषिक कौशल्य, दळणवळण, अभिव्यक्ती यांचा त्याच्या वर्तमान आणि भविष्यावर कसा परिणाम होतो याचे सविस्तर विवेचन.
4. मानवी भावभावना, विचार, विकार इत्यादींचा जगभरातील निसर्गावर कसा आणि कितीप्रकारे परिणाम होतो याच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण पद्धतीचा विकास.
Question Number : 18 Question Id : 4410092486624 Question Type : MCQ
'अरे , घरोटा घरोटा, माझे दुखता रे हात तसं संसाराचं गानं, माझं बसते मी गात.'वरील आशयघन काव्यपंक्ती कु णी लिहिलेल्या आहेत ?
Options :
1. नारायण सुर्वे
2. बहिणाबाई
3. दुर्गा भागवत
4. मुक्ताबाई
Question Number : 19 Question Id : 4410092472389 Question Type : MCQ
ब्राह्मणवादी अभिजन संस्कृ ती आणि शूद्रातिशूद्र यांच्यातील संघर्षाचे प्रवाही चित्रण कोणत्या साहित्यकृ तीतून अभिव्यक्त झाले आहे?
Options :
1. कोसला
2. गुलामगिरी
3. फकिरा
4. झूल
Question Number : 20 Question Id : 4410092475205 Question Type : MCQ
'सत्यशोधकी जलसे' कोणत्या सामाजिक प्रयोजनातून निर्माण झाले होते?
Options :
1. अभिजन संस्कृ तीचा प्रसार करण्यासाठी
2. बहुजन समाजाचे सामाजिक प्रबोधन करण्यासाठी
3. लोकसंस्कृ तीचे अभिसरण करण्यासाठी
4. कर्मकांडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी
Question Number : 21 Question Id : 4410092475271 Question Type : MCQ
भूमिकानिष्ठ लेखनाचे उत्तम उदाहरण म्हणून पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृ तीचा उल्लेख करता येईल?
Options :
1. झोंबी
2. बनगरवाडी
3. ययाती
4. गुलामगिरी
Question Number : 22 Question Id : 4410092475347 Question Type : MCQ
स्त्री, दलित आणि सामाजिक विषमता या प्रश्नांचे अनुभवाधिष्ठित चित्रण करून सामाजिक विषमतेची जाणीव कोणत्या साहित्यकृ तीतून निर्माण करण्यात आली
आहे?
Options :
1. आयदान
2. व्यक्ती आणि वल्ली
3. मिरासदारी
4. कोसला
Question Number : 23 Question Id : 4410092478550 Question Type : MCQ
"एका भाषेतील साहित्यकृ ती दुसऱ्या भाषेत अनुवादित होताना, मूळ साहित्य आणि लक्ष्य भाषा या दोन्हीचे सांस्कृ तिक-भाषिक घटक एकमेकांमध्ये मिसळतात." हे
विधान कोणत्या भूमिके चे समर्थन करते?
Options :
1. अर्थनिर्णयन
2. परस्पर प्रभाव
3. सामाजिक प्रेरणा
4. कारण मीमांसा
Question Number : 24 Question Id : 4410092475497 Question Type : MCQ
'साहित्यकृ तीचे मूलद्रव्य कायम ठे वून कादंबरीचे नाटक करणे, कथेला नाट्यरूप देणे किं वा नाट्यरूपाला श्रुतिके चे रूप देणे.' हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारात
मोडते?
Options :
1. अनुकृ ती
2. रूपांतर
3. भावानुवाद
4. मुक्त अनुवाद
Question Number : 25 Question Id : 4410092478556 Question Type : MCQ
मराठी दलित साहित्याचे अनेक भारतीय भाषांमध्ये झालेले भाषांतर हे प्रामुख्याने कोणत्या प्रेरणेतून झाले आहे ?
Options :
1. सामाजिक प्रेरणा
2. राजकीय प्रेरणा
3. सांस्कृ तिक प्रेरणा
4. भाषांतराची प्रेरणा
Question Number : 26 Question Id : 4410092228220 Question Type : MCQ
खालीलपैकी कोणती संकल्पना राजकीय प्रभावाचे 'सॉफ्ट पॉवर' माध्यम दर्शवते?
Options :
1. लष्करी आक्रमण
2. आर्थिक निर्बंध
3. सांस्कृ तिक देवाणघेवाण
4. गुप्तहेर कारवाया
Question Number : 27 Question Id : 4410092478552 Question Type : MCQ
भारतीय साहित्यावर पुढीलपैकी कोणत्या साहित्य परं परे चा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो?
Options :
1. संस्कृ त साहित्य
2. वसाहतवादी साहित्य
3. पाश्चात्य साहित्य
4. लोकसाहित्य
Question Number : 28 Question Id : 4410092478553 Question Type : MCQ
'वसाहतकालीन भारतात इंग्रजी ही राजकीय, प्रशासनिक आणि ज्ञानसत्तेची भाषा झाली'. हे पुढीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
Options :
1. स्थानिकांचे धोरण
2. भारतीय भाषांची उदासीनता
3. प्रभाव आणि सत्ता संबंध
4. इंग्रजी भाषेची सर्वसमावेशकता
Question Number : 29 Question Id : 4410092228223 Question Type : MCQ
मराठी साहित्यात इंग्रजी 'सॉनेट' च्या धरतीवर 'सुनीत' हा चौदा ओळींचा काव्यप्रकार सर्वप्रथम यशस्वीपणे रुजवणारे आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण?
Options :
1. बा. भ. बोरकर
2. के शवसुत
3. कवी बी
4. माधव ज्यूलियन
Question Number : 30 Question Id : 4410092228242 Question Type : MCQ
मराठी साहित्यात 'हायकू ' या काव्यप्रकार सर्वप्रथम कोणी आणला?
Options :
1. सुरे श भट
2. मंगेश पाडगावकर
3. शिरीष पै
4. बा. भ. बोरकर
Question Number : 31 Question Id : 4410092228221 Question Type : MCQ
खालीलपैकी कोणत्या आधुनिक मराठी कवीने ' सुनीत' या काव्यप्रकारावर प्रभुत्व मिळवून तब्बल १०१ सुनीतांचा 'तुटलेले दिवे ' हा स्वतंत्र सुनीतसंग्रह प्रकाशित
के ला?
Options :
1. कु सुमाग्रज
2. माधव ज्यूलियन
3. बा. सी. मर्ढे कर.
4. विं. दा. करं दीकर
Question Number : 32 Question Id : 4410092228253 Question Type : MCQ
'घाशीराम कोतवाल' या नाटकावर प्रामुख्याने कोणत्या लोककलेचा प्रभाव आहे ?
Options :
1. तमाशा
2. कीर्तन
3. गोंधळ
4. पोवाडा
Question Number : 33 Question Id : 4410092228255 Question Type : MCQ
मराठी लोकसाहित्यात 'जात्यावरील ओव्या' हा वाङ्मयप्रकार प्रामुख्याने कोणाचे भावविश्व प्रकट करतो ?
Options :
1. ग्रामीण कष्टकरी स्त्रियांचे
2. पंडित्य जाणणाऱ्या पुरोहितांचे
3. मागासलेल्या, कष्टकरी लोकांचे
4. अभिजन वर्गातील सुशिक्षित महिलांचे
Question Number : 34 Question Id : 4410092228269 Question Type : MCQ
साहित्याच्या परिभाषेत 'लोकतत्त्व' या संकल्पनेचा अचूक अर्थ काय आहे?
Options :
1. पाश्चात्य छं दशास्त्राचे नियम आणि अक्षरांवरील स्वराघातावर आधारित तत्त्व
2. विशिष्ट लोकसमूहाच्या जगण्यातून आणि परं परे तून आलेले सांस्कृ तिक अंश किं वा घटक
3. आधुनिक विज्ञानावर आधारित तांत्रिक पारिभाषिक शब्द आणि तात्विक शब्द
4. प्रस्थापित शासकीय कायदे, नियम, आणि प्रशासकीय परिपत्रके यांमधील क्लिष्ट तांत्रिक भाषा
Question Number : 35 Question Id : 4410092228283 Question Type : MCQ
लोकधार्मिकतेमध्ये मानवी संकट निवारणासाठी निसर्गातील शक्तींना पुजण्याची जी प्राचीन प्रवृत्ती आढळते, त्याला काय म्हणतात?
Options :
1. भौतिकवाद
2. निसर्गपूजा
3. नास्तिकवाद
4. वैज्ञानिक वास्तववाद
Question Number : 36 Question Id : 4410092229722 Question Type : MCQ
महाराष्ट्रातील 'बैलपोळा' किं वा 'नागपंचमी' या परं परा प्रामुख्याने कोणत्या संस्कृ तीचे दर्शन घडवतात?
Options :
1. नागरी व औद्योगिक संस्कृ ती
2. पाश्चात्य आधुनिक संस्कृ ती
3. कृ षी आणि निसर्गाश्रित लोकसंस्कृ ती
4. प्राचीन राजेशाही संस्कृ ती
Question Number : 37 Question Id : 4410092228278 Question Type : MCQ
प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या 'जैत रे जैत' या कादंबरीवर आणि कवितेवर कोणत्या विशिष्ट जमातीच्या लोकघटकांचा प्रभाव दिसून येतो?
Options :
1. वारली
2. ठाकर
3. गोंड
4. कोलाम
Question Number : 38 Question Id : 4410092228281 Question Type : MCQ
बहिरट, झाडीबोली, अहिराणी किं वा मालवणी या लोकभाषांचा (बोलींचा) मराठी साहित्यातील वापर कशाचे दर्शन घडवतो?
Options :
1. भाषेचा अपभ्रंश किं वा अशुद्धता
2. प्रादेशिक लोकसंस्कृ तीचे लोकतत्त्व आणि जिवंतपणा
3. के वळ नागरी संस्कृ तीचा प्रभाव
4. पाश्चात्य भाषेचे अंधानुकरण
Question Number : 39 Question Id : 4410092229717 Question Type : MCQ
शेतीची गाणी किं वा श्रमगीतांमध्ये देवापेक्षा कोणाला जास्त महत्त्व असते?
Options :
1. माणसाचे कष्ट आणि ऐहिक जगणे
2. परलोकातील सुख
3. संस्कृ त मंत्र
4. राजेशाही इतिहास आणि कथा
Question Number : 40 Question Id : 4410092229933 Question Type : MCQ
दलित साहित्याच्या निर्मितीमागे प्रामुख्याने कोणती मुख्य प्रेरणा कार्यान्वित राहिलेली आहे ?
Options :
1. के वळ सौंदर्यवादी आनंद मिळवणे.
2. आंबेडकरांचे विचार, अन्यायाविरुद्धचा विद्रोह.
3. निव्वळ काल्पनिक विश्वाचे रं जन करणे.
4. पारं पारिक धार्मिक ग्रंथांचे उदात्तीकरण करणे.
Question Number : 41 Question Id : 4410092229955 Question Type : MCQ
दलित साहित्याच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य कें द्रबिंदू कोण आहे?
Options :
1. ईश्वर आणि निसर्ग
2. काल्पनिक नायक
3. श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्ग
4. शोषित आणि उपेक्षित 'माणूस'
Question Number : 42 Question Id : 4410092456417 Question Type : MCQ
'निर्वाणा अगोदरची पीडा' या काव्यसंग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत?
Options :
1. दया पवार
2. नामदेव ढसाळ
3. राजा ढाले
4. अर्जुन डांगळे
Question Number : 43 Question Id : 4410092229942 Question Type : MCQ
प्रस्थापित विषम व्यवस्थेला दिलेला 'विद्रोह आणि नकार' हे दलित साहित्याचे अविभाज्य लक्षण मानले जाते, कारण —
Options :
1. ते के वळ उच्चभ्रू वर्गाच्या साहित्याला विरोध करण्यासाठी लिहिले गेले.
2. ते शोषित मानवाच्या मुक्तीचा आणि समतेचा जाहीरनामा आहे.
3. त्यात के वळ संभ्रमित आणि संथ स्वरूपाची मांडणी आढळते.
4. ते मानवाला आध्यात्मिक मोक्षाकडे नेण्याचा मार्ग दाखवते.
Question Number : 44 Question Id : 4410092230023 Question Type : MCQ
मराठी दलित लघुकथेचे जनक किं वा प्रणेते म्हणून कोणाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते?
Options :
1. बाळकृ ष्ण भगवंत बोरकर.
2. वि. स. खांडेकर.
3. ना. सी. फडके .
4. बाबूराव बागूल.
Question Number : 45 Question Id : 4410092456589 Question Type : MCQ
दलित कादंबरीने मराठी कादंबरी विश्वात कोणता महत्त्वाचा बदल घडवून आणला?
Options :
1. के वळ कल्पित व अद्भुत विश्वाचा विस्तार के ला.
2. भाषेचे अभिजातिकरण के ले.
3. उपेक्षित, वंचित मानवी घटकांना आणि त्यांच्या वास्तवाला कें द्रस्थानी आणले.
4. ऐतिहासिक घटनांचे काल्पनिक रूप मांडले.
Question Number : 46 Question Id : 4410092456686 Question Type : MCQ
दलित नाटकांचे मुख्य वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते मानले जाते?
Options :
1. ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचे आधुनिक दृष्टिकोनातून पुनर्मांडणी
2. सामाजिक विषमता, शोषणाचा निषेध आणि वैचारिक प्रबोधन
3. पारं परिक लोककला प्रकारांचे (उदा. तमाशा, भारुड) जतन व संवर्धन
4. कौटुंबिक नातेसंबंध आणि व्यक्तिगत भावनिक संघर्षांचे चित्रण
Question Number : 47 Question Id : 4410092456977 Question Type : MCQ
लोकसाहित्याच्या संकल्पनेचा विचार करता, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य लोकसाहित्याचे व्यवच्छे दक लक्षण मानले जात नाही?
Options :
1. परं परे ने चालत आलेला मौखिक प्रवाह
2. विशिष्ट लेखकाचा किं वा कर्त्याचा अभाव (अकर्तृत्व)
3. स्थलकालानुसार होणारी परिवर्तनशीलता
4. लिखित स्वरूपातील व व्याकरणाची काटेकोर प्रमाणबद्धता
Question Number : 48 Question Id : 4410092457108 Question Type : MCQ
लोककथा आणि लोकगीतांचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते?
Options :
1. लेखकाचे नाव ठळकपणे नोंदवलेले असणे.
2. कडक व्याकरणाचे नियम
3. मुद्रित स्वरूपातील मूळ प्रत
4. अज्ञातकर्तृत्व आणि मौखिक प्रवाहीपण
Question Number : 49 Question Id : 4410092457231 Question Type : MCQ
साहित्याच्या इतिहासलेखनात 'सामाजिक-सांस्कृ तिक' दृष्टिकोन का महत्त्वाचा मानला जातो?
Options :
1. कारण साहित्य हे समाजमनाचा आणि युगीन संदर्भांचा आविष्कार असते.
2. कारण सामाजिक संदर्भांच्या अभ्यासामुळे साहित्यकृ तीचे मूळ साहित्यिक सौंदर्य बाधित होते असते.
3. कारण साहित्यातील आशय पूर्णपणे लेखकाच्या अंतर्दृष्टीचा आणि व्यक्तिगत मनः स्थितीचा भाग असतो.
4. कारण यामुळे पुस्तकांची खरे दी, विक्री आणि पर्यायाने वाचन वाढते.
Question Number : 50 Question Id : 4410092457996 Question Type : MCQ
मराठी साहित्याच्या इतिहासलेखनात 'तौलनिक पद्धती' (Comparative Method) कशासाठी वापरली जाते?
Options :
1. विविध भाषांतील व संस्कृ तीतील साहित्याची तुलना करून तिचे वेगळे पण शोधण्यासाठी
2. इतर भाषांमधील साहित्याचा कोणताही संदर्भ न घेता, के वळ मराठी साहित्यकृ तीच्या भाषिक विश्लेषणासाठी
3. ग्रंथांच्या हस्तलिखितांची तपासणी करून त्यांच्या के वळ लिपीच्या कालनिर्णयाची पुरातत्वीय सत्यता पडताळण्यासाठी
4. साहित्यकृ तींमधील पात्रांच्या वर्तनाचा आणि मानसिक संघर्षाचा अभ्यास करून के वळ वाचकांच्या वैयक्तिक समुपदेशनासाठी
Question Number : 51 Question Id : 4410092457156 Question Type : MCQ
लोकभ्रमाचा आणि विधींचा लोकसाहित्याशी काय संबंध असतो?
Options :
1. विधी आणि लोकभ्रम यातून अनेक लोककथा व लोकगीते जन्माला येतात.
2. लोकभ्रम आणि विधी हे मानवी संस्कृ तीच्या व लोकसाहित्याच्या परं परे शी संबंधित नाहीत.
3. लोकभ्रम आणि विधींचा लोकसाहित्याशी असणारा संबंध हा के वळ कृ त्रिम आहे.
4. लोकभ्रम आणि विधीं ह्या लोकसाहित्याशी के वळ तांत्रिक अहवाल या नात्याने संबंधित असतात.
Question Number : 52 Question Id : 4410092457351 Question Type : MCQ
मराठी साहित्याच्या इतिहासलेखनात 'महानुभाव पंथाचे' स्थान काय आहे?
Options :
1. मराठीतील आद्य गद्यग्रंथ निर्मितीचे श्रेय
2. संस्कृ त भाषेविषयी आदर आणि सन्मानाचे श्रेय
3. सांके तिक लिपींपासून मुक्तीचे श्रेय
4. तत्त्वज्ञानात्मक साहित्यरचनेपासून अलिप्ततेचे श्रेय
Question Number : 53 Question Id : 4410092457883 Question Type : MCQ
शिवछत्रपतींच्या काळात भाषेच्या शुद्धीकरणासाठी कोणता कोश तयार करण्यात आला?
Options :
1. राज्यव्यवहार कोश
2. मराठी शब्दकोश
3. ज्ञानकोश
4. सुबोध कोश
Question Number : 54 Question Id : 4410092458000 Question Type : MCQ
साहित्याच्या इतिहासातील 'युगप्रवर्तक लेखक' ही संकल्पना काय दर्शवते?
Options :
1. ज्या लेखकाने आपल्या साहित्यातून नव्या वाङ्मयीन युगाची व प्रवाहाची सुरुवात के ली.
2. ज्या लेखकाने तत्कालीन साहित्यातील जुन्या परं परांचे व विचारांचे यथार्थ चित्रण के ले.
3. ज्या लेखकाने आपल्या साहित्यकृ तींनी सामाजिक व राजकीय क्रांतीला गती दिली.
4. ज्या लेखकाने प्राचीन आणि आधुनिक साहित्यातील विचारांचा मेळ घालून समन्वय साधला.
Question Number : 55 Question Id : 4410092458008 Question Type : MCQ
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळीद्वारे मराठीत आणलेले शब्द कोणते?
Options :
1. चित्रपट, महापौर
2. शिवाय, हल्ली
3. प्रचलित, अमोद
4. तारतम्य, घटकनिहाय
Question Number : 56 Question Id : 4410092210379 Question Type : MCQ
भारतीय जनतेला 'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा.’हा मूलमंत्र कोणी दिला?
Options :
1. महात्मा फु ले
2. राजर्षी छत्रपती शाहू महाराज
3. क्रांतीज्योती सावित्रीबाई फु ले
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question Number : 57 Question Id : 4410092210381 Question Type : MCQ
अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीने ग्रामीण भागातील शोषितांना सशस्त्र लढ्याची प्रेरणा दिली?
Options :
1. झोंबी
2. फकिरा
3. जीवनकलह
4. तांबडी माती
Question Number : 58 Question Id : 4410092210386 Question Type : MCQ
थोर समाजसुधारक महात्मा फु ले यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर प्रकाश टाकणारा 'शेतकऱ्याचा असूड' हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या वर्षी लिहून पूर्ण के ला?
Options :
1. १८७३
2. १८८१
3. १८८३
4. १८९१
Question Number : 59 Question Id : 4410092458006 Question Type : MCQ
मध्ययुगीन भक्तिचळवळीचे सामाजिक योगदान कोणते मानले जाते?
Options :
1. वर्णव्यवस्था व जातीभेदावर प्रहार करून मानवी समतेची रुजवण
2. तत्कालीन राजेशाहीच्या सार्वभौमत्वाला आध्यात्मिक मान्यता
3. परकीय आक्रमणांविरुद्ध सैनिकी संघटनेची बांधणी आणि कें द्रिय राजकीय सैनिकी अधिराज्याची निर्मिती
4. सरं जामीशाहीच्या सामाजिक चौकट आणि पुरोहितशाहीच्या अधिकारांचे बळकटीकरण
Question Number : 60 Question Id : 4410092210414 Question Type : MCQ
पारं परिक पांढरपेशा अभिरुचीला धक्का देऊन ग्रामीण आणि बोलीभाषेला साहित्यात प्रतिष्ठा मिळवून देणारा प्रवाह कोणता?
Options :
1. सौंदर्यवादी साहित्य
2. महानुभाव साहित्य
3. ग्रामीण आणि बहुजन साहित्य
4. रहस्यकथा साहित्य
Question Number : 61 Question Id : 4410092228374 Question Type : MCQ
महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या 'सिंहासन' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Options :
1. विजय तेंडु लकर
2. भालचंद्र नेमाडे
3. वसंत कानेटकर
4. अरुण साधू
Question Number : 62 Question Id : 4410092210397 Question Type : MCQ
कसदार (दर्जेदार) साहित्य आणि सुमार दर्जाचे साहित्य यांमधील फरक ओळखणारी अभिरुची कोणती असते?
Options :
1. व्यावसायिक अभिरुची
2. विवेचक अभिरुची
3. प्राथमिक अभिरुची
4. तात्कालिक अभिरुची
Question Number : 63 Question Id : 4410092210477 Question Type : MCQ
साहित्यातील 'अभिरुचीची पूर्व-संरचना' म्हणजे नेमके काय?
Options :
1. साहित्य कृ ती लिहिण्यापूर्वी लेखकाने तयार के लेला आराखडा
2. प्रकाशकाने बाजारात पुस्तक आणण्यापूर्वी के लेले नियोजन
3. वाचकाच्या मनात आधीपासूनच तयार असलेले वाङ्मयीन संके त आणि संस्कार
4. पुस्तकाची छपाई आणि मुखपृष्ठाची रचना
Question Number : 64 Question Id : 4410092228432 Question Type : MCQ
लोकशाहीर 'अण्णा भाऊ साठे ' यांच्या साहित्यावर आणि लेखनावर खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो?
Options :
1. भांडवलशाही आणि साम्राज्यवादी विचारसरणी
2. अस्तित्ववादी आणि निराशावादी विचारसरणी
3. मार्क्सवादी (साम्यवादी) आणि आंबेडकरी विचारसरणी
4. गांधीवादी आणि अध्यात्मवादी विचारसरणी
Question Number : 65 Question Id : 4410092210500 Question Type : MCQ
हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजातील वास्तवावर लिहिलेली प्रसिद्ध कादंबरी कोणती?
Options :
1. इंधन
2. कफन
3. रथचक्र
4. तातडी
Question Number : 66 Question Id : 4410092228450 Question Type : MCQ
मराठी साहित्यात 'बालवाङ्मयाचे जनक' म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव के ला जातो?
Options :
1. वासुदेव गोविंद आपटे
2. साने गुरुजी
3. भा. रा. भागवत
4. विनायक कोंडदेव ओक
Question Number : 67 Question Id : 4410092228445 Question Type : MCQ
प्रसिद्ध वैज्ञानिक कथासंग्रह 'रोबो कॉर्नर' विनोदाच्या माध्यमातून लिहिणाऱ्या लेखकाचे नाव ओळखा.
Options :
1. डॉ. अरुण मांडे
2. डॉ. जयंत नारळीकर
3. डॉ. बाळ फोंडके
4. निरं जन घाटे
Question Number : 68 Question Id : 4410092249517 Question Type : MCQ
भारतातील औद्योगिक कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे 'कामगार चळवळीचे आद्यप्रवर्तक' म्हणून कोणाचा उल्लेख के ला जातो?
Options :
1. नारायण मल्हार जोशी
2. नारायण मेघाजी लोखंडे
3. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question Number : 69 Question Id : 4410092228412 Question Type : MCQ
महानगरीय साहित्यात खालीलपैकी कोणत्या घटकाचे चित्रण नसते ?
Options :
1. गगनचुंबी इमारती आणि झोपडपट्ट्यांमधील दरी
2. ग्रामीण भागातील शेती आणि दुष्काळाच्या समस्या
3. लोकल ट्रेन, गर्दी आणि धावपळीचे जीवन
4. माणसाचा एकाकीपणा आणि नातेसंबंधातील ताणतणाव
Question Number : 70 Question Id : 4410092210490 Question Type : MCQ
मराठी भाषेतील पहिले आधुनिक गद्य आणि ललित ख्रिस्ती साहित्यिक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख के ला जातो?
Options :
1. रे व्हरं ड नारायण वामन टिळक
2. बाबा पदमनजी
3. फा. फ्रान्सिस दिब्रिटो
4. रे व्हरं ड अलेक्झांडर डफ
Question Number : 71 Question Id : 4410092228413 Question Type : MCQ
मुंबईतील 'नाका संस्कृ ती' आणि महानगरीय वास्तवाचे चित्रण असणारी गाजलेली कादंबरी 'वासूनाका' चे लेखक कोण?
Options :
1. भालचंद्र नेमाडे
2. जयवंत दळवी
3. बाबुराव बागूल
4. भाऊ पाध्ये
Question Number : 72 Question Id : 4410092228421 Question Type : MCQ
१० नोव्हेंबर १९७९ रोजी आदिवासींचे पहिले अधिकृ त स्वतंत्र साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते?
Options :
1. चंद्रपूर
2. पालघर
3. यवतमाळ
4. नंदुरबार
Question Number : 73 Question Id : 4410092255766 Question Type : MCQ
कवीच्या प्रतिभा सामर्थ्यामुळे शब्द आणि अर्थ यांना कोणते रूप प्राप्त होते?
Options :
1. सामान्य आणि सोपे रूप
2. अपूर्व आणि चमत्कृ तिपूर्ण रूप
3. शास्त्रीय आणि व्याकरणिक रूप
4. व्यावहारिक आणि क्लिष्ट रूप
Question Number : 74 Question Id : 4410092266755 Question Type : MCQ
आचार्य वामनांनी रीति सिद्धांताचे मुख्य किती प्रकार मानले आहेत?
Options :
1. दोन
2. तीन
3. चार
4. पाच
Question Number : 75 Question Id : 4410092255802 Question Type : MCQ
खालीलपैकी कोणता पर्याय सर्जनशीलतेचा मुख्य घटक नाही?
Options :
1. विपुलता किं वा प्रवाहित्व
2. लवचिकता
3. विस्तार किं वा पूर्ती
4. अनुकरण किं वा पाठांतर
Question Number : 76 Question Id : 4410092266754 Question Type : MCQ
खालीलपैकी 'रूढी लक्षणा' शब्दशक्ती नसलेले वाक्य ओळखा.
Options :
1. माझ्या मते त्याचे पारडे जड आहे.
2. सध्या बाजारात प्रचंड तेजी आहे.
3. त्याने संकट पाहून पाठ फिरवली.
4. लाला लजपतराय म्हणजे पंजाबचा सिंह होते.
Question Number : 77 Question Id : 4410092255757 Question Type : MCQ
नाथ संप्रदायाचे पहिले मानवी आचार्य कोण होते, ज्यांनी विस्कळीत झालेल्या योग परं परे ला एकत्र करून 'नाथ पंथाचा' पद्धतशीर पाया रचला?
Options :
1. मत्स्येंद्रनाथ
2. जालंधरनाथ
3. गहिनीनाथ
4. कानिफनाथ
Question Number : 78 Question Id : 4410092249527 Question Type : MCQ
महानुभाव पंथाचा मुख्य तात्त्विक कणा मानल्या जाणाऱ्या 'सूत्रपाठ' या ग्रंथाचे संकलन आणि संपादन चक्रधर स्वामींच्या कोणत्या पंडिताने के ले ?
Options :
1. के शिराज व्यास
2. नागदेवाचार्य
3. म्हाइंभट
4. भास्करभट बोरीकर
Question Number : 79 Question Id : 4410092249533 Question Type : MCQ
खालीलपैकी कोणती काव्यकृ ती ही वामन पंडितांची अत्यंत लोकप्रिय 'आख्यान रचना' मानली जाते, ज्यामध्ये त्यांनी कृ ष्णभक्तीचे वर्णन के ले आहे?
Options :
1. के कावली
2. नलदमयंती स्वयंवर
3. वेणुसुधा
4. विवेकसिंधू
Question Number : 80 Question Id : 4410092255761 Question Type : MCQ
नेपाळमधील बौद्ध धर्मीय लोक नाथ संप्रदायाचे आद्य गुरु श्री मत्स्येंद्रनाथ (मच्छिं द्रनाथ) यांना कोणत्या देवतेचा अवतार मानून त्यांची पूजा करतात?
Options :
1. मंजुश्री
2. पद्मसंभव
3. अवलोकितेश्वर
4. वज्रपाणी
Question Number : 81 Question Id : 4410092249542 Question Type : MCQ
अभंग हा प्रामुख्याने कोणत्या संप्रदायातील संतांचे मुख्य वाङ्मयीन माध्यम आहे?
Options :
1. महानुभाव संप्रदाय
2. वारकरी संप्रदाय
3. दत्त संप्रदाय
4. समर्थ संप्रदाय
Question Number : 82 Question Id : 4410092266766 Question Type : MCQ
प्राचीन मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत लोकप्रिय मानले गेलेले 'दमयंतीस्वयंवर' हे आख्यानकाव्य कोणी रचले आहे?
Options :
1. वामन पंडित
2. मोरोपंत
3. रघुनाथ पंडित
4. मुक्तेश्वर
Question Number : 83 Question Id : 4410092249545 Question Type : MCQ
लावणी या वाङ्मयप्रकाराचे शास्त्रीय वर्गीकरण प्रामुख्याने कोणत्या दोन रचनाप्रकारांनुसार किं वा दृष्टिकोनांतून करण्यात येते?
Options :
1. ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या
2. राजकीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या
3. आशयदृष्ट्या आणि आविष्कारदृष्ट्या
4. व्याकरणदृष्ट्या आणि छं दशास्त्रदृष्ट्या
Question Number : 84 Question Id : 4410092249552 Question Type : MCQ
मराठी शाहिरी वाङ्मय परं परे तील पहिला उपलब्ध ऐतिहासिक पोवाडा 'अफझलखान वध' हा कोणी रचला होता?
Options :
1. शाहीर तुळसीदास
2. शाहीर अज्ञानदास
3. शाहीर प्रभाकर
4. शाहीर अनंत फं दी
Question Number : 85 Question Id : 4410092227672 Question Type : MCQ
खालीलपैकी कोणत्या प्रमुख प्रक्रियेमुळे प्रवासवर्णनाचे स्वरूप हे के वळ अनुभवकथनापुरते मर्यादित न राहता त्यास लालित रूप येते?
Options :
1. प्रवासात प्रत्यक्ष पाहिलेल्या - अनुभवलेल्या गोष्टी स्थानिक बोलीभाषेच्या आणि संवादात्मक रूपात के लेली मांडणी
2. देश, काल, परिस्थितीचे आणि प्रवासातील अनुभवांचे कथन वस्तुनिष्ठ सादरीकरण
3. प्रवासातील अनुभवांचा पुनर्शोध आणि त्यांची नव्याने के ली जाणारी पुनर्र चना
4. लेखकाने प्रवासाच्या दरम्यान के लेल्या नोंदी, प्रवासस्थळाच्या भूरचनात्मक नोंदीचे आत्मनिष्ठ अभिव्यक्ती
Question Number : 86 Question Id : 4410092249567 Question Type : MCQ
'जन नाट्य मंच' या प्रसिद्ध नाट्यसंस्थेची स्थापना करणारे आणि भारतातील पथनाट्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व कोण?
Options :
1. विजय तेंडु लकर
2. बादल सरकार
3. सफदर हाश्मी
4. अण्णाभाऊ साठे
Question Number : 87 Question Id : 4410092260177 Question Type : MCQ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्धच्या संघर्षावर आधारित कोणते आधुनिक महाकाव्य रचले?
Options :
1. कमला
2. गोमांतक
3. सप्तर्षी
4. महासागर
Question Number : 88 Question Id : 4410092290989 Question Type : MCQ
रिं गणनाट्याची कल्पना खालीलपैकी कोणत्या नाटककाराच्या नाट्यकृ तींना समांतर जाणारी नाही?
Options :
1. बादल सरकार
2. हबीब तन्वीर
3. जयशंकर प्रसाद
4. सफदर हाश्मी
Question Number : 89 Question Id : 4410092250360 Question Type : MCQ
संत तुकारामाच्या अभंगांतून पुढीलपैकी कोणत्या तीन संतांचे उल्लेख आढळतात?
Options :
1. कबीर, नरसी, रामानंदाचार्य
2. कबीर, नरसी, मीराबाई
3. कबीर, मीराबाई, गुरू नानक
4. कबीर, रवीदास, गुरू नानक
Question Number : 90 Question Id : 4410092256215 Question Type : MCQ
लीळाचरित्र मधील चक्रधरोक्त सूत्रे व दृष्टान्त निवडू न त्या दृष्टान्तांतून सूचित के लेले तत्त्व 'दार्ष्टांतिक' या नावाने कु णी जोडले आहेत?
Options :
1. खेइंभट
2. भटोबास
3. के सोबास
4. रवळोव्यास
Question Number : 91 Question Id : 4410092239671 Question Type : MCQ
शिवकालीन राज्यकारभार आणि भाषाभ्यासाच्या दृष्टीने मौलिक असलेल्या 'आज्ञापत्र' या ग्रंथाबद्दल ''मराठी वाङ् मयाचा अमूल्य आणि अपूर्व अलंकार" अशी नोंद
के ली आहे.
Options :
1. श्री. ना. बनहट्टी
2. द. वा. पोतदार
3. वि. भि. कोलते
4. वि. का. राजवाडे
Question Number : 92 Question Id : 4410092292504 Question Type : MCQ
कृ ष्णाजी अनंत सभासद कृ त ‘सभासद बखर’ लेखनाने मराठीमध्ये बखर साहित्याचे एक समृद्ध व संपन्न दालन साकार झाले. यासंदर्भातून ‘सभासदे रचिला पाया ।
उभारलें बखरालया ।।’ अशी नोंद कोणी के ली आहे?
Options :
1. का. ना. साने
2. भीमराव कु लकर्णी
3. र. वि. हेरवाडकर
4. शं. ना. जोशी
Question Number : 93 Question Id : 4410092239630 Question Type : MCQ
पुढील गौळणीचे रचनाकार ओळखा.
"हरी तुझी कांती रे सावळी। मी रे गोरी चांपेकळी।
तुझ्या दर्शनें होईन काळी। मग हें वाळी जन मज।।"
Options :
1. संत तुकाराम
2. संत जनाबाई
3. संत ज्ञानेश्वर
4. संत एकनाथ
Question Number : 94 Question Id : 4410092250221 Question Type : MCQ
बेबी कांबळे यांच्या 'जिणं आमुचं' च्या मौलिकतेची नोंद घेताना कोणत्या आंतरराष्ट्रीय संशोधिके ने "जिणं आमुचं समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांच्या दृष्टीने एक
अमोल खाण ठरे ल" अशी नोंद घेतलेली आहे?
Options :
1. एलेन झेलिओट
2. मॅक्सीन बर्नसन
3. गेल ओमवेट
4. इरावती कर्वे
Question Number : 95 Question Id : 4410092255452 Question Type : MCQ
होनाजी बाळा यांनी तुकोबांच्या आध्यात्मिक – सामाजिक कार्याचा गौरव के लेला आहे, तर सगनभाऊ शब्दकळे च्या व गायनाच्या अंगाने तुकोबांच्या अभंगांचा
विचार करून ते ‘लाघवी’ असल्याचे नोंदवितात.
Options :
1. संपूर्ण विधान चूक आहे.
2. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
3. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
4. संपूर्ण विधान बरोबर आहे.
Question Number : 96 Question Id : 4410092250215 Question Type : MCQ
उर्मिला पवार यांच्या 'आयदान' मधून महाराष्ट्राच्या कोणत्या विभागातील अवकाश त्याच्या भाषा, संस्कृ ती आणि प्रथा परं परे सह चित्रित झालेला आहे?
Options :
1. खानदेश
2. विदर्भ
3. कोकण
4. मराठवाडा
Question Number : 97 Question Id : 4410092292484 Question Type : MCQ
अनुराधा पाटील यांच्या 'आता वह्या सगळ्या बुडीत खाती' या संग्रहातील कवितेबद्दल 'अभिजन संस्कृ तीच्या सत्ताकें द्रांवर हल्ला चढवणारी व बहुजनांच्या निरं तर
कळवळ्याची भाषा बोलणारी ही कविता थेट तुकारामाच्या जातकु ळीतली भासते.' असे विधान कोणी के ले आहे?
Options :
1. सुचिता खल्लाळ
2. सुनंदा बोरकर
3. रणधीर शिंदे
4. प्रवीण बांदेकर
Question Number : 98 Question Id : 4410092250218 Question Type : MCQ
'आयदान' म्हणजे बांबूच्या बारीक पट्ट्यांपासून विणलेल्या वस्तू (सुपं, रोवळ्या, परड्या, हारे , करं डे इ.) होय. या अर्थाने उर्मिला पवार यांनी आयदान या शब्दासाठी
वापरला जाणारा अन्य कोणता शब्द नोंदविला आहे?
Options :
1. आवतं
2. तवाळकं
3. सपारं
4. खापरं
Question Number : 99 Question Id : 4410092250220 Question Type : MCQ
शंकर पाटील यांच्या 'वळीव' या कथासंग्रहामधील खालीलपैकी कोणत्या कथेत 'जयसिंगराव पाटील' ही कें द्रवर्ती व्यक्तिरे खा चित्रित झाली आहे?
Options :
1. कणव
2. खेळ
3. टिपिशन
4. जुगळ्याकाका
Question Number : 100 Question Id : 4410092478379 Question Type : MCQ
'माणूस' या कादंबरीचे लेखन कोणी के ले आहे ?
Options :
1. व्यंकटेश माडगूळकर
2. श्री. ना. पेंडसे
3. भाऊ पाध्ये
4. मनोहर तल्हार