महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

आरोग्य पर्यवेक्षक अभ्यासक्रम 2026 – ZP Health Supervisor Syllabus

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
आरोग्य पर्यवेक्षक अभ्यासक्रम – ZP Health Supervisor Syllabus
आरोग्य पर्यवेक्षक अभ्यासक्रम – ZP Health Supervisor Syllabus
notifications_active

दररोज मोफत अपडेट्स, चालू घडामोडी व PDF नोट्स मिळवा

आमच्या अधिकृत चॅनल्सवर त्वरित सामील व्हा:

जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक (Health Supervisor) पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या सामान्य विषयांसोबत विज्ञान आणि आरोग्यविषयक तांत्रिक अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 9 मे 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन परिपत्रकानुसार आरोग्य पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेची प्रश्नसंख्या, गुण, वेळ आणि विषयांची काठिण्य पातळी निश्चित करण्यात आली आहे.

या लेखामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदाची परीक्षा पद्धती, सामान्य विषयांचा अभ्यासक्रम आणि अधिकृत शासन परिपत्रकातील तांत्रिक अभ्यासक्रम दिला आहे.

1. आरोग्य पर्यवेक्षक परीक्षा पद्धती

आरोग्य पर्यवेक्षक पदासाठीची परीक्षा एकूण 100 प्रश्नांची व 200 गुणांची असून परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.

विषयप्रश्नसंख्यागुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
बुद्धिमापन व गणित1530
तांत्रिक प्रश्न4080
एकूण100200

परीक्षेचा कालावधी : 120 मिनिटे

प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी :

  • मराठी व इंग्रजी – बारावी स्तर
  • सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित – पदवी स्तर
  • विज्ञान व आरोग्यविषयक तांत्रिक प्रश्न – पदवी स्तर व संबंधित विषयांच्या निर्धारित काठिण्य पातळीनुसार

2. सामान्य विषयांचा अभ्यासक्रम

आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी मराठी आणि इंग्रजी विषयांचा दर्जा बारावीचा, तर सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित विषयांचा दर्जा पदवी स्तराचा निर्धारित करण्यात आला आहे.

अ) मराठी (बारावी स्तर)

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • वाक्यरचना
  • व्याकरण
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न

ब) इंग्रजी (बारावी स्तर)

  • General Vocabulary
  • Sentence Structure
  • Grammar
  • Idioms & Phrases – their meaning and use
  • Comprehension

क) बुद्धिमापन व गणित (पदवी स्तर)

  • सामान्य बुद्धिमापन व आकलन
  • तर्क आधारित प्रश्न
  • अंकगणित आधारित प्रश्न

ड) सामान्य ज्ञान (पदवी स्तर)

  • भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ – महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह
  • महाराष्ट्र, भारत व जागतिक भूगोल – भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल
  • भारत आणि महाराष्ट्र – राज्य व शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतराज, सार्वजनिक धोरण आणि हक्कांचे मुद्दे
  • आर्थिक व सामाजिक विकास – शाश्वत विकास ध्येये (SDGs), गरीबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
  • सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
  • पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
  • भारतीय अर्थव्यवस्था, विकासविषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास
  • चालू घडामोडी – आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्रातील
  • कृषी आणि ग्रामीण विकास
  • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी व वैशिष्ट्ये

3. आरोग्य पर्यवेक्षक तांत्रिक अभ्यासक्रम

आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी शासन परिपत्रकातील परिशिष्ट ब, प्रकार ‘क’ मध्ये स्वतंत्र तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे.

अ) विज्ञान व जैववैद्यकीय विषय

  • Biophysics and Radiation Science
  • Nuclear Physics
  • Laws of Motion
  • Conservation Laws
  • Gravitation
  • Electrostatics
  • Ultrasonic and Acoustics
  • Thermodynamics
  • Biochemical Analysis
  • Separation Techniques
  • Metabolism
  • Body Fluids
  • Liver / Kidney / Gastric / Thyroid Function
  • Organic Chemistry
  • Material Science
  • Biochemistry
  • Nanotechnology
  • Molecular Biology
  • Cell Biology
  • Immunology
  • Biotechnology
  • Pathology
  • Anatomy
  • Physiology
  • Microbiology – Virology, Mycology, Serology

ब) सार्वजनिक आरोग्य व आरोग्यसेवा

  • माहिती, शिक्षण आणि संदेशवहन
  • घरगुती सेवा व प्राथमिक वैद्यकीय उपचार
  • आरोग्यविषयक माहिती आणि जीवनविषयक आकडेवारी
  • समाजासाठी आरोग्य सेवा
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान
  • माहिती तंत्रज्ञान
  • आयुष
  • विविध आरोग्य दिन
  • पर्यावरण आणि आरोग्य

क) रोग व रोगप्रतिबंधक आरोग्य

  • लैंगिक आजार
  • इतर आजार
  • संसर्गजन्य आजार
  • राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
  • कीटकजन्य आजार
  • लसीद्वारे टाळता येणारे आजार
  • हवेद्वारे पसरणारे आजार
  • पाण्याद्वारे पसरणारे आजार
  • सूक्ष्मजीवशास्त्र व वैयक्तिक स्वच्छता

ड) पोषण व माता-बाल आरोग्य

  • आहार व पोषणशास्त्र
  • माता, प्रजनन व बाल आरोग्य

4. अभ्यासासाठी महत्त्वाचे मुद्दे

आरोग्य पर्यवेक्षक परीक्षेची तयारी करताना पुढील बाबींवर विशेष लक्ष द्यावे:

  1. तांत्रिक विषय: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांचा अभ्यास करा.
  2. सार्वजनिक आरोग्य: राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य सेवा आणि आरोग्यविषयक योजनांचा अभ्यास करा.
  3. रोग व प्रतिबंध: संसर्गजन्य रोग, कीटकजन्य रोग, लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपाय समजून घ्या.
  4. माता व बाल आरोग्य: माता आरोग्य, प्रजनन आरोग्य, बाल आरोग्य आणि पोषणशास्त्र या घटकांचा अभ्यास करा.
  5. सामान्य विषय: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन यांची नियमित सराव चाचणी सोडवा.

5. आरोग्य पर्यवेक्षक अधिकृत अभ्यासक्रम PDF

आरोग्य पर्यवेक्षक पदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती अधिकृत शासन परिपत्रकात दिलेली आहे. संपूर्ण शासन परिपत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.

जिल्हा परिषद भरती – अधिकृत अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती PDF डाउनलोड करा

शासन परिपत्रक तपशील:

  • विभाग: ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
  • दिनांक: 9 मे 2023
  • परिपत्रक क्रमांक: संकीर्ण 2023/प्र.क्र.67/आस्था-8
  • शासन संकेतांक: 202305091602164620

अधिक पदनिहाय अभ्यासक्रमासाठी जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम – सर्व पदांचा अभ्यासक्रम हे मुख्य पृष्ठ पाहा.

महत्त्वाची टीप: वरील अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या 9 मे 2023 रोजीच्या शासन परिपत्रकावर आधारित आहे. नवीन भरती जाहिरात किंवा सुधारित शासन आदेश प्रसिद्ध झाल्यास त्यानुसार अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरातही तपासावी.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →