महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

जनश्री विमा योजना

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
जनश्री विमा योजना
जनश्री विमा योजना

योजनेची सुरुवात – 10 ऑगस्ट, 2010

योजनेत कार्यवाही – अकरावी पंचवार्षिक योजना

उद्देश – दारिद्र्यरेषेखालील व असुरक्षित शहरी व ग्रामीण भागातील व्यक्तींना विम्याचा लाभ मिळवून देणे.

जनश्री विमा योजना या योजनेच्या लाभार्थ्यास 200 रुपये वार्षिक हप्ता असे. यातील 100 लाभार्थ्यांद्वारे व 100 रुपये जीवन विमा निगम (LIC) च्या सामाजिक सुरक्षा निधीतून (SSF) पुरविले जातील.

जनश्री विमा योजना या योजनेतील लाभार्थ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30,000 रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास 75,000  रुपये वारसदारास मदत म्हणून दिले जाते. अपंगत्व आल्यास 75,000 रुपये व आंशिक अंपगत्व आल्यास 37, 500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

योजनेचे व्यवस्थापन जीवन विमा निगम (LIC) च्या सामाजिक सुरक्षा निधी मार्फत पाहिले जाते.

या योजनेंतर्गत 18 ते 59 वयोगटातील 45 प्रकारच्या व्यवसायिकांची निवड केली जाते.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →