मेक इन इंडिया
मेक इन इंडिया

योजनेची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 25 सप्टेंबर 2014 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मेक इन इंडिया इंडिया कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

उद्देश

गुंतवणुकीस चालना देणे

तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणे

कौशल्य विकासात वाढ करणे

बौध्दिक संपदेचे संरक्षण आणि आधुनिक सोयी सुविधांची निर्मिती इत्यादी उद्देशाने MII कार्यक्रम सुरू करण्यात आला

मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत उद्योगसंस्थांना यांचा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी www.makeinindia.com वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस  डेव्हलपमेंट इंडिया या नावाने ओळखावे असे म्हटले

मेक इन इंडिया अंतर्गत जागतिक व्यापारात हिस्सेदारी वाढवण्यासाठी लुक इस्ट च्या बरोबर लिंक वेस्ट ची कल्पना सुचविण्यात आली

मेक इन इंडिया अभियानांतर्गत खालील 25 उत्पादन क्षेत्राची निवड करण्यात आली आहे

  1. वाहन उद्योग
  2. विमान
  3. जैवतंत्रज्ञान
  4. निरोगीपणा
  5. अवकाश
  6. बंदर
  7. रेल्वे
  8. खाणकाम
  9. आय टी  आणि bpm
  10. रसायने
  11. चामडे
  12. बांधकाम
  13. अन्नप्रक्रिया
  14. औषधे
  15. औष्णिक ऊर्जा
  16. पर्यटन
  17. पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा
  18. कापड
  19. तेल आणि वायू
  20. मनोरंजन
  21. रस्ते आणि महामार्ग
  22. इलेक्ट्रॉनिक यंत्रणा
  23. इलेक्ट्रॉनिक machinery
  24. संरक्षण उत्पादने
  25. वाहनांच्या सुट्या भागांचे उद्योग

महाराष्ट्र मेक इन इंडिया

13 ते 18 फेब्रुवारी 2016 दरम्यान महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक भरारीला उभारी देणारा एक राष्ट्रीय सोहळा मेक इन इंडिया सप्ताह मुंबईच्या  वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वबळावर भारत निर्माण चे स्वप्न या माध्यमातून जगासमोर मांडण्याची संधी मेक इन इंडिया सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याला मिळाले.

मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत  2594 सामंजस्य करार करण्यात आले.

राज्य शासनाच्या उद्योग विभागाने केंद्र शासनाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग व भारतीय औद्योगिक महासंघ यांच्या सहकार्याने मेक इन इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताह अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आलेले पुरस्कार

  • यंग मेकर ऑफ द इयर – अजंता फार्मा कंपनी योगेश अग्रवाल
  • बेस्ट इन क्लास मॅन्युफॅक्चरिंग – टाटा मोटर्स
  • इनोव्हेटर ऑफ द इयर  – हिरो मोटर्स
  • मेक इन इंडिया मध्ये 102 देशांचा सहभाग नोंदविण्यात आला

मेक इन इंडिया सप्ताह अंतर्गत महाराष्ट्रातील विभागनिहाय गुंतवणूक

  • मराठवाडा व विदर्भ 1 लाख 50 हजार कोटी रुपये
  • पुणे 50 हजार कोटी
  • खानदेश 25 हजार कोटी
  • मुंबईसह कोकण विभाग 3 लाख 25 हजार कोटी

मेकिंग इंडिया सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले धोरणे

  • किरकोळ व्यापार धोरण
  • सागरी किनारा विकास धोरण
  • एक खिडकी योजना
  • अनुसूचित जाती-जमातींच्या उद्योजकांसाठी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना
  • इलेक्ट्रॉनिक्स धोरण

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.