महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
काशीनाथ राजवाडे
काशीनाथ राजवाडे

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे 

(जुलै १२, १८६३ – डिसेंबर ३१, १९२६)

हे मराठी इतिहास-संशोधक होते.

त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

राजवाड्यांचा जन्म जुलै १२, १८६३ रोजी महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. [१]

बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले हाते.

१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. जुलै ७, १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.

डिसेंबर ३१, १९२६ रोजी राजवाड्यांचे निधन झाले.

राजवाडे म्हणायचे – ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →