शिवकालीन पाणी साठवण योजना 2002
शिवकालीन पाणी साठवण योजना 2002

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा शिवकालीन पाणी साठवण योजना हा घटक असून पारंपारिक व अपारंपारिक उपाययोजनांद्वारे  पाण्याचे संधारण करणे, पाण्याच्या स्त्रोतांचे सक्षमीकरण, छतावरील पावसाच्या पाण्याची साठवणूक, पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगराळ भागात तलाव बांधणी यासारखे उपाययोजनांद्वारे  पिण्याचे पाणी सातत्याने उपलब्ध होण्याच्या उद्देशाने राज्यात शिवकालीन पाणी साठवण योजना राबविण्यात येत आहे.

योजनेच्या सुरुवातीपासून (2002) ते डिसेंबर, 2015 पर्यंत 15,170 वस्त्यांची निवड करून 44,472 उपायोजना निश्चित करण्यात आल्या असून 12,503 वस्त्यांमध्ये 34,913 उपायोजना पूर्ण झाले आहेत व त्यावर 49,250 कोटी रुपये खर्च झाला.

पावसाच्या पाण्याची साठवण ही जलसंधारणासाठी एक महत्त्वाची उपायोजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात डिसेंबर, 2015 पर्यंत पावसाच्या पाण्याच्या साठवणीसाठी 11, 085 बांधकामे करण्यात आली असून त्यापैकी 1, 034 कोकण, 1, 279 पुणे, 654 नाशिक, 4,013 औरंगाबाद, 2, 114 अमरावती आणि 1, 991 नागपूर विभागात झाली आहेत.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.