महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

IMD वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ यामध्ये भारताचा 43 वा क्रमांक

calendar_today update person लेखक: soni soni verified MPSC Today अधिकृत लेख
IMD World Competitiveness Ranking 2020 - https://www.mpsctoday.com/
IMD World Competitiveness Ranking 2020 - https://www.mpsctoday.com/

इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD)

या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे.

कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे भारताला “जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020” या क्रमवारीत 43 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

भारतासाठी, दीर्घकालीन रोजगारात वाढ, चालू खात्यातली शिल्लक, उच्च तंत्रज्ञानाची निर्यात, परकीय चलन साठा, शिक्षणावरील सार्वजनिक खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकूणच उत्पादकता या क्षेत्रांमध्ये सुधारणा नोंदविण्यात आल्या आहेत. तथापि, विनिमय दर स्थिरता, वास्तविक GDP वृद्धी, स्पर्धात्मक कायदे आणि कर यासारख्या क्षेत्रात स्थिती कमकुवत झाली आहे.

इतर ठळक बाबी

या 63 अर्थव्यवस्थांच्या यादीत सिंगापूर या देशाने पहिले स्थान कायम राखले आहे.

सिंगापूरच्या यशामागील घटक म्हणजे त्याची मजबूत आर्थिक कामगिरी जी भक्कम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार आणि कामगार बाजारपेठेच्या उपायांमुळे उद्भवते. शिक्षण प्रणाली आणि दूरसंचार, इंटरनेट बँडविड्थ वेग आणि उच्च तंत्रज्ञानाची निर्यात यासारख्या तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांमधील स्थिर कामगिरी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

सिंगापूरच्या पाठोपाठ अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकावर, डेन्मार्क, स्वित्झर्लँड, नेदरलँड्स आणि हाँगकाँग SAR या देशांचा क्रम लागतो आहे.

मध्य-पूर्व प्रदेश तेलाच्या संकटामुळे नकारात्मकपणे प्रभावित झाले आहे.

BRICS देशांमध्ये चीननंतर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक यादीत रशिया 50 वा, ब्राझील 56 वा आणि दक्षिण आफ्रिका 59 व्या क्रमांकावर आहे.

सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ASEAN देशांमध्ये केवळ सिंगापूर आणि थायलंड या देशांची आरोग्यासेवा संबंधी पायाभूत सुविधांच्या परिणामकारकतेत सकारात्मक कामगिरी आहे.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →