ब्रिक्स (BRICS)
ब्रिक्स (BRICS)

हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे शिखर संघटन सुरुवातीला चार देश या संघटनेचे सदस्य त्यावेळी “ब्रिक” या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले.

ब्रिक्स (BRICS)

जगाच्या भूमीच्या जवळपास एक चतुर्थाश भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या जी.डी.पी.च्या ४० टक्के जी.डी.पी. ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे.

संघटनेची उद्दिष्ट व कार्ये

जगाच्या नकाशावर ब्रिक्स गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे ,परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्सची 13 वी शिखर परिषद online स्वरुपात झाली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

सर्व ब्रिक्स परिषदा

🇷🇺 २००९ : येकातेरिनबर्ग , रशिया
🇧🇷 २०१० : ब्रासीलिया , ब्राझील
🇨🇳 २०११ : सान्या , चीन
🇮🇳 २०१२ : नवी दिल्ली , भारत
🇿🇦 २०१३ : डरबन , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१४ : फोर्टालेज़ा , ब्राझील
🇷🇺 २०१५ : उफ़ा , रशिया
🇮🇳 २०१६ : गोवा , भारत
🇨🇳 २०१७ : ज़ियामेन , चीन
🇿🇦 २०१८ : जोहान्सबर्ग , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१९ : ब्रासिलिया , ब्राजील
🇷🇺 २०२० : सेंट पीटर्सबर्ग , रशिया (आ. माध्यम)
🇮🇳२०२१ : नवी दिल्ली, भारत (आ. माध्यम)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.