भारतीय राज्यघटना – Indian Polity
भारतीय राज्यघटना – Indian Polity

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४८ (जानेवारी २०२०) कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही अतिशय लवचीक असून तिच्या मदतीने जगातील इत्तर राज्यघटनांपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.

भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत ग्क्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे

भाग I कलम १ ते ४संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
भाग IIकलम ५ ते ११ नागरिकत्व 
भाग IIIकलम १२ ते ३५मूलभूत हक्क
भाग IVकलम ३६ ते ५१राज्याचे मार्गदर्शक तत्वे 
भाग IVAकलम ५१ Aमूलभूत कर्त्यव्ये
भाग Vकलम ५२ ते १५१केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VIकलम १५२ ते २३७राज्य सरकार 
भाग VII7 वी घटनादुरुस्तीरद्द
भाग VIIIकलम२३९-२४२केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IXकलम २४३-२४३O पंचायतराज
ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद
नगर पंचायत 
भाग IX Aकलम २४३P – २४३ZG नगरपालिका
भाग IX B कलम ZH – कलम ZT सहकारी संस्था
भाग X कलम २४४-२४४A अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ
 भाग XI कलम २४५ – २६३संघ-राज्य संबंध 
 भाग XII कलम २६४-३००A महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद
 भाग XIII कलम ३०१-३०७ व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
 भाग XIV कलम ३०८-३२३ केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग
 भाग XIV A कलम ३२३A, ३२३B न्यायाधिकरणे
 भाग XV कलम ३२४-३२९A निवडणुका
 भाग XVIकलम ३३०-३४२  अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
 भाग XVII  कलम ३४३-३५१ कार्यालयीन भाषा
 भाग XVIIII कलम ३५२-३६० आणीबाणी विषयक तरतुदी
 भाग XIX कलम ३६१-३६७ संकीर्ण
 भाग XX कलम ३६८संविधान दुरुस्ती बाबत (घटनादुरूस्ती तरतुदी)
 भाग XXI कलम ३६९-३९२ अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी
 भाग XXII कलम ३९३-३९५संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
भारतीय राज्यघटना – एकूण २२ भाग

परिशिष्ट

परिषिष्ठ – भारतीय राज्यघटना (Schedules of Indian Constitution)

1.परिशिष्ट Iराज्य व केंद्र शासित प्रदेश
2.परिशिष्ट IIवेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)
3.परिशिष्ट IIIपद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)
4.परिशिष्ट IVराज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण
5.परिशिष्ट Vभारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
6.परिशिष्ट VIआसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी
7.परिशिष्ट VIIकेंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.
8.परिशिष्ट VIIIभाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.
9.परिशिष्ट IX कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
10.परिशिष्ट X  पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.
11. परिशिष्ट XI पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.
12. परिशिष्ट XII हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात १८ विषय आहेत.

भारतीय राज्यघटनेचे स्रोत 

1.भारतीय शासन कायदा, 1935 :-संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील 
2.ब्रिटिश राज्यघटना :-संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार
3.अमेरिकेची राज्यघटना :-उपराष्ट्रपती पद, मूलभूत हक्क, संघराज्य, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत 
4.कॅनडाची घटना :-प्रभावी केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेञ 
5.आयर्लंडची राज्यघटना :-राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची केलेली पद्धत, राज्यसभेवरील काही सदस्यांचे नामनिर्देशन (२५० पैकी १२ सदस्य ) 
6.ऑस्ट्रेलियाची राज्यघटना :-समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन
7.जर्मनीची राज्यघटना :-आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे
8.जपानची राज्यघटना :-कायद्याने प्रस्तावित पध्द्त
9.सोविएत रशियाची राज्यघटना :-मूलभूत कर्त्यवे आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श.
10.दक्षिण आक्रिकेची राज्यघटना :- घटनादुरुस्ती पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
11.फ्रान्सची राज्यघटना :-गणराज्य पद्धती आणि प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श

भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे

महत्वपूर्ण घटनादुरुसत्या (Important Constitutional Amendments)

भारतातील सरन्यायाधीश

संसदेविषयी महत्त्वाची माहीती

पक्षांतरबंदी कायदा (भारत) Anti-Defection Law

महाधिवक्ता (Advocate General)

भारतीय राज्यघटना  (Indian Polity)

– जादुटोना विरोधी कायदा

बालकाविषयक समस्या, अधिकार आणि योजना

पोलिस कारवाईसंबंधी माहिती

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

6 Comments

  1. It’s very important and useful wedsite
    Better’ information is Indian constitution
    Thank for MPSC website
    MPSC syllabus & Preparation

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *