विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती
विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती

विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आणि कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.

विधान परिषद केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर जम्मू कश्मीरमधून काढून टाकण्यात आली

भारतातील विधानपरिषद असणारे राज्य
भारतातील विधानपरिषद असणारे राज्य

आंध्र प्रदेश 1957 स्थापन 1985 ला रद्द
परत 2005 ला कायदा आणि 2007 पासून पासून स्थापन

तामिळनाडू 1986 ला रद्द
पंजाब आणि पश्चिम बंगाल 1969 रद्द

तामिळनाडू 2010 शिपरस पण अमलात येण्यापूर्वी 2011 पासून कायदा करून बरखास्त करण्यात आली.

विधानपरिषदेची रचना

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

  1. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
  2. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
  3. 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
  4. 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
  5. 1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल :
सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल :
विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :
विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *