Indian constitution
Indian constitution

भाग  IV-A (4 अ) मूलभूत कर्तव्य

कलम 51 (A) हा भाग 42 वी घटनादुरुस्ती 1976 अनुसार सरदार स्वरणसिंग समितीच्या शिफारसीवरून संविधानात जोडण्यात आला. या भागाचे मूळ स्त्रोत सोविएत संघ रशिया आहे.

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांसाठी पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेतली आहे. जपानची राज्यघटना ही नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देणारी जगातील लोकशाही देशांतील एकमेव असावी.

संविधानाच्या दुरुस्तीद्वारे कलम ५१-क द्वारा, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विशद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला व ही दुरुस्ती ३ जानेवारी १९७७ पासून अमलात आली. त्यामुळे तीन जानेवारी हा ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिन’ म्हणून पाळला जातो. मूलभूत कर्तव्यांचा भाग हा भारतीय संविधानाचा प्राण आहे.

सन 1976 मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला. सन 2002 मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला.

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांसाठी पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेतली आहे. जपानची राज्यघटना ही नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देणारी जगातील लोकशाही देशांतील एकमेव असावी.

सन 1976 मध्ये 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम संमत केला. या दुरुस्तीअनवये घटनेत ‘भाग 4 ए’ नव्याने समाविष्ट करण्यात आला. या भागात फक्त एकच कलम (51ए ) आहे. या कलमात प्रथमच नागरिकांची दहा मूलभूत कर्तव्ये मांडली आहेत.

याचा उद्देश:-  अधिकार नंतर काही कर्त्यव्ये यानुसार संविधानात 10 कर्तव्य जोडण्यात आले. 86 वी घटनादुरुस्ती 2002 द्वारे आणखीन एक कर्तव्य सोडण्यात आले.

आज एकूण कर्तव्यांची संख्या 11 आहे

यानुसार प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असेल की

1.भारतीय संविधान देशातील आदर्श संस्थाने राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा
2.स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्त्वांचे पालन करावे
3.भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे
4.देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच संरक्षण करण्याकरिता सामील व्हावे.
5.सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे. व असे सर्व रीतींचा / प्रथांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल.
6.सामाजिक सांस्कृतिक गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे.
7.नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन करावे रक्षण करून संवर्धन करावे त्याचबरोबर प्राणिमात्रांच्या प्रति दयाभाव ठेवावे.
8.मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.
9.सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे.
10.व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा. ज्यानी राष्ट्राची प्रगती होईल.
11.प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

3 Comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *