भाग-2 नागरिकत्व ( कलम 5 ते 11)
यानुसार नागरिकत्व प्राप्ती आणि समाप्ती या विषयाचे वर्णन करण्यात आले आहे
कलम 5:- यानुसार संविधान लागू करण्याच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जे लोक भारतामध्ये राहतात त्याचबरोबर ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे असेल किंवा व्यक्तीचे माता किंवा पिता भारतीय असतील किंवा आजी किंवा आजोबा भारतीय असतील या सर्वांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल.
कलम 6:- यानुसार 19 जुलै 1948 पूर्वी जे ही लोक पाकिस्तानातून भारतात आले असतील व तेव्हापासून भारतात निवास करत असतील त्यांनाही भारतीय नागरिक म्हटले जाईल.
कलम 7:- यानुसार एखादा भारतीय व्यक्ती पाकिस्तानात गेली असेल व तो पुन्हा 19 जुलै 1948 पर्यंत परत आली असेल तर त्या व्यक्तीलाही भारतीय नागरिक म्हटले जाईल.
कलम 8:- यानुसार एखादी व्यक्ती विदेशामध्ये राहात असेल तिचा जन्म भारताच्या बाहेर झालेला असेल व त्या व्यक्तीची आई किंवा वडील आजी किंवा आजोबा भारतीय नागरिक असतील आणि त्या व्यक्तीने इतर देशाचे नागरिकत्व स्विकारलेले नसेल त्या व्यक्तीलाही भारतीय नागरिक म्हटले जाईल.
कलम 9:- यानुसार नागरिकत्व समाप्तीचे वर्णन करण्यात आलेली आहे. यानुसार एखादे भारतीय व्यक्ती जेव्हा इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारत असेल आणि त्याने भारतीय नागरिकत्व त्यागले असेल तर अशा व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व समाप्त केले जाईल.
कलम 10:- यानुसार संसदेला नागरिकत्व विषयी अधिनियम तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे व यानुसार संसदेने नागरिकत्व प्राप्ती करण्याकरिता नागरिकत्व अधिनियम 1955 बनवलेला आहे. 5 प्रकारे भारतीय नागरिकत्व मिळवता येते
1) जन्माद्वारे :- ज्याही व्यक्तीचे जन्म भारतात झालेला असेल. 26 जानेवारी 1950 च्या नंतर व त्याचे आई किंवा वडील हे भारतीय नागरिक असतील अशा व्यक्तीला जन्माद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल अपवाद विदेशी नागरिक व व त्यांचे अपत्य यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होणार नाही.
2) नोंदणीकृत नागरिकत्व :- याद्वारे जो व्यक्ती विदेशी असेल परंतु बाया भारतामध्ये 7 वर्षांपेक्षा जास्त कालावधी मध्ये भारतात वास्तव्य करत असेल व कोणत्याही देश विघातक कार्यांमध्ये आढळलेला नसेल इतर देशाचे नागरिकत्व त्यागले असेल व अशा स्त्रिया ज्यांचा विवाह भारतीय पुरुषांची झालेला असेल अशा व्यक्तींना आपल्या नावाची नोंदणी करून नागरिकत्व प्राप्त करता येईल.
नोंदणीकृत भारतीय व्यक्ती ही पंतप्रधान, राष्ट्रपती बनू शकतो.
3) वंशपरंपरा द्वारे नागरिकत्व :- असे व्यक्ती ज्यांचा जन्म विदेशामध्ये झालेला असेल व ज्यांचे माता किंवा पिता भारतीय असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल.
4) देशीकरणाद्वारे नागरिकत्व :- भारताच्या बाहेरील एखादा प्रांत भारतामध्ये विलीन होण्यास इच्छुक असेल व देशाने त्यास मान्यता दिली असेल तर तेथील सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व आपोआप प्राप्त होईल
उदा:- सिक्कीम व पाॅंंडिचेरी
5) विलीनीकरणाद्वारे नागरिकत्व:- एखाद्या सीमा क्षेत्राच्या बाहेरील भाग भारताने विलीन केला असेल तर त्या भागातील सर्व लोकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल.
उदा. गोवा,लक्षद्वीप, दादर व नगर हवेली
कलम 11:- यानुसार संसदेला कायदा करून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व समाप्त करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यानुसार एखादी व्यक्ती देशविघातक कार्यात आढळत असेल तर तिचे नागरिकत्व काही दिवस काही महिने काही वर्ष किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे.
उदाहरण:- बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, प्रवीण तोगडिया
2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात नागरिकता अधिनियम 2003 पारित करण्यात आले व या वर्षापासून देशात भारतीय प्रवासी दिन 9 जानेवारीला सुरू करण्यात आला. यानुसार जे काही विदेशी व्यक्ती जे विदेशांमध्ये राहतात व त्यांचे पूर्वज कधीकाळी भारतीय नागरिक होते अशा व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
अपवाद:- बांगलादेश, पाकिस्तान