Indian Constitution Part I
Indian Constitution Part I

भाग 1: संघराज्य क्षेत्र कलम 1 ते 4

यामध्ये एकूण 4 कलम आहेत व या भागाचे नाव संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र असे  आहे.

कलम 1

यानुसार संघाचे नाव भारत आणि India असे असेल. यामध्ये एकूण 28 राज्य व  9 केंद्रशासित प्रदेश  आहेत. व या सर्वांना मिळुन  संघराज्य क्षेत्र बनलेले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी देशामध्ये 11  ब्रिटिश प्रांत आणि 562 देशी संस्थनिके (राजेरजवाडे) एवढे मिळून देशाचे क्षेत्र होते. यापैकी 20 देशी – संस्थानिके हे पकिस्तानमध्ये गेले. 542 पैकी 539 संस्थानिके भारतात विलिन  झाले. व तीन संस्थाने  

(1)जूनागढ   (2) हैद्राबाद   (3) J & K

यांच्या विलिनीकरणामध्ये समस्या निर्माण झाली. हैद्राबाद आणि जुनागड ही संस्थाने शासक मुस्लिम आणि बहुसंख्य जनता हिंदू या नावाखाली भारतात विलिन करण्यात आली. तर जम्मू व काश्मीरवर पाकिस्तानने केलेले आक्रमणामुळे राजा हरिसिंग यांच्या सहमतीवरून हा प्रांत भारतात विलिन करण्यात आला.

1946 च्या त्रिमंत्री योजनेनुसार देषामध्ये 11 प्रांत आणि 542 देशी संस्थानिका मिळून A, B, C, D या स्वरूपाचे राज्य बनवण्यात आले.

पूर्ण मराठवाडा हैद्राबादच्या निझामाच्या ताब्यात होता. तो भारत स्वात्रंत्र्यं झाल्यावर 1948 मध्ये भारतात विलिन झाला. 1965 मध्ये India & Pak War च्या वेळेस लालबहादुरशास्त्री PM होते.

LAC (Line at Actual Contral) China Bordez

A  स्वरूपाचे राज्य :-  

जे क्षेत्र हिंदू बहूल असतील त्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त असेल अशा स्वरूपाचे राज्य A स्वरूपाचे राज्यांमध्ये टाकण्यात आले. यामध्ये 216 देशी संस्थानिके मिळून 10 राज्य निर्माण करण्यात आले.

1)आसाम  2) बिहार  3) मुंबई  4) मध्यप्रदेश  5) मद्रास  6) ओरिसा  7) पंजाब  8) संयुक्त प्रांत   9) पश्चिम बंगाल  10) हैद्राबाद

B स्वरुपाचे राज्य :-  

 यामध्ये मुस्लिम बहुल प्रांताचे समावेश करण्यात आले. यामध्ये एकंदरित राज्याची संख्या 8 होती.            

1) J & K  2) मध्यभारत  3) म्हैसूर (तिपुसुल्तानचा)  4)पैप्सू (पंजाबमधील लुधियाना)  5) राजस्थान  6) सौराष्ट  7) त्रावणकोर 8) कोचीन

C स्वरुपाचे राज्य :-

हे हिंदू आणि मुस्लिम दोघांचे मिळून ऐकत्रित प्रांत बनवण्यात आले. यामध्ये राज्यांची संख्या 9 होती.

  1. अजमेर
  2. भोपाल
  3. कुर्ग
  4. दिल्ली
  5. हिमाचल प्रदेश
  6. मणिपूर
  7. त्रिपुरा
  8. विंध्याप्रदेश
  9. कच्छा

D स्वरूपाचे राज्य :-

यामंध्ये अंदमान व निकोबार यांचा समावेश करण्यात आला. स्वतांत्रप्राप्तीनंतर राज्याचे पुनर्गठन हे  भाषिक तत्वांवर व्हावे अशी जनतेची मागणी होवू लागली. त्यानुसार संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 27 November 1947 रोजी राज्य पुनर्गठन आयोग S.K. Dhar यांच्या अध्यक्षतेखाली बसवला. यांनी 1948 मध्ये आपला अहवाल सादर केला व असे सांगितले की राज्याचे पुनर्गठन भाषेच्या आधारावर न करता प्रशासनाच्या आधारावर करा.

धर च्या अहवालाचाही लोकांनी विरोध केला. कॉंग्रेसचे 1949 चे जयपूर अधिवेशनामधे राज्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी JVP समिती बसविण्यात आली. यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या / पट्ट्पति सीतारामय्या यांनी सुद्धा राज्य प्रशासनाच्या आधारावर बनवावे अशी शिफारस केली.

JVP प्रशासनाच्या आधारावर राज्य बनवावे.

JVP च्या अहवालाच्या मोठया प्रमाणात विरोध झाला. मद्रास प्रांतातुन तेलगू भाषिकांचा एक राज्य बनावा या करीता“ पोट्टीश्रीरामलु ” यांनी उपोषण सुरु केले. 56 दिवसानंतर त्यांची मृत्यु झाली. यामुळे हे आंदोलन तीव्र झाले. यानुसार 29 December 1952 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तेलगू भाषिकांचा एक वेगळा प्रदेश आंध्रप्रदेश निर्माण करण्याची घोषणा केलि. यानुसार 1 October 1953 रोजी भाषेवर अधारित पाहिले राज्य आंध्र प्रदेश हे बनले.

संविधान सभेचा सदस्य होता धर 1956 मध्ये फजल आली आयोग राज्य भाषेच्या आधारावर बनवण्यात यावे यासाठी बनवण्यात आले.

आणि या अनुसार इतर राज्यांनेही भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करण्यास सुरुवात केली. या करिता 22 December 1953 मध्ये भाषेवर राज्य बनवण्याकरिता राज्यपुनर्गठ आयोग बनवण्यात आला त्याचे अध्यक्ष फजल अली हे होते.

अध्यक्षासहित हृदयनाथ कुंजरू व इतिहासकार K. M. पाननीकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या आयोगाचे A, B, C, D, स्वरूपाचे राज्य विभाजित करून 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे अशी शिफारस केली या आधारावर राज्यपुनर्गठन अधिनियम 1956 पारित करण्यात आला आणि त्यानुसार भारत सरकारने 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.

1956 मध्ये भारत सरकारने बनवलेले 14 राज्य

  1. आंध्रप्रदेश
  2. आसाम
  3. बिहार
  4. बॉम्बे
  5. जम्मू & कश्मीर (J & K)
  6. केरला
  7. मध्यप्रदेश
  8. मद्रास
  9. म्हैसूर
  10. ओडिशा
  11. पंजाब
  12. राजस्थान
  13. उत्तर प्रदेश (U. P)
  14. पश्चिम बंगाल

 केंद्रशासित प्रदेश :-

  1. अंदमान व निकोबार
  2. दिल्ली
  3. हिमचाल प्रदेस
  4. लॉकेडीव, मीनकॉय व अमांडवी (लक्ष्यद्वीप चे जुने नाव)
  5. मणिपुर
  6. त्रिपुरा  

1956 नंतर भाषेच्या आधारावर राज्य बनवावे ही मागणी सुरु होती.

महाराष्ट्र व गुजरात :-

1960 मध्ये बॉम्बे या प्रांतातुन मराठी भाषिकांचे महाराष्ट्र व गुजराती भाषिकांचे गुजरात असे 15 वे राज्य बनवण्यात आले.                                      

दादर व नगर हवेली

1954 पर्यंत या क्षेत्रांवर पोर्तुगीजांचे राज्य होते. 1961 मध्ये 10 वी घ. दु. करुन हे भारतात विलिन करण्यात आले.

गोवा, दमन व दीव

पोर्तुगीजांचे राज्य होते 1961 पर्यंत कोकणी भाषा आहे गोव्याची Operation Vijay करुन पोर्तुगीजांजवळून गोवा भारतात विलिन करण्यात आला.

12 वी घ. दु. करुन गोवा, दमन व दीव भारतामध्ये विलिन 1962 मध्ये विलीन करण्यात आले. 1961 पर्यंत इथे पोर्तुगीजांचे राज्य होते. 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. त्यापूर्वी हे केंद्रशासित प्रदेश होते.             

फ्रान्सचा – नेपोलियन

भारताचा नेपोलियन समुद्रगुप्तला म्हणतात.

पुड्डचेरी (फ्रेंच वसाहती होत्या.)

प्रशासकीय भाषा :-

फ्रेंच व तामील माहे, यानम व कार्यालय व पॉंडिचेरी यांना मिळून पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश बनते. इथे फ्रेंच लोकांचे वसाहती होते. 1962 मध्ये याला भारतात विलीन करण्यात आले.

नागालैंड

1963 मध्ये आसामचे विभाजन करुन 16 वे राज्य नागालैंड बनवण्यात आले. हॉर्नबील संस्कृति नागालैंड ची आहे. मोंगोलाईट जमात आहे नागालैंडची आसाममधील बोडो आदिवासी जमाती सोबत नागा आदिवासीचे जमातींचे पटत नव्हत म्हणून नागालैंड बनवण्यात आला.

 हरियाणा, चंडीगड़ व हिमाचल प्रदेश 

1966 मध्ये पंजाबचे विभाजन करुन 17 वे राज्य हरियाणा बनवण्यात आले. व हिमाचल प्रदेशला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देण्यात आला. परंतु 1971 मध्ये हिमाचल प्रदेशाला 18 व्या भारतीय राज्याचा दर्जा देण्यात आला.                                       

मणिपूर त्रिपूरा  व मेघालय 

मणिपूरा व त्रिपुराला 1972 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला. NEFA ( North East Frontier Agency ), मिझोराम व अरुणाचल प्रदेश ज्यांना NEFA म्हणायचे यांनाही राज्यांचा दर्जा देण्यात आला.

पेप्सू  – पटियाला, जालिंदर

19 वे राज्य मणिपूर

20 वे राज्य त्रिपुरा

21 वे राज्य मेघलाय बनवण्यात आले.

सिक्किम: हे राज्य चौगीचाल वंशाकडे होते. 1974 मध्ये 35 वी घ. दु. करुन याला भारतात विलिन करण्यात आले. 22 वे राज्य होय सिक्किम.

मिझोराम, अरुणाचल प्रदेश व गोवा: 1987  मध्ये मिझोराम 23 वे अ अरुणाचल प्रदेश 24 वे व  गोवा  25 वे  राज्य बनवण्यात आले.

छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड: सन 2000 मध्ये मध्यप्रदेश प्रदेश मधून 26 वे राज्य छत्तीसगढ़ उत्तर प्रदेश मधून 27 वे राज्य उत्तारखंड,  बिहारमधून 28 वे राज्य झारखंड बनवण्यात आले.

तेलांगाना: 2 June 2014  ला हे राज्य आंध्रप्रदेश मधून बनवण्यात आले. सर्वात लहान राज्य आहे. याची राजधानी  हैद्राबाद आहे.

नावांमधे झालेले बदल  

  • 1969 मध्ये मद्रासला तमिळनाडु हे नाव देण्यात आले.
  • 1973 ला म्हैसूर या राज्याला कर्नाटक हे नाव देण्यात आले.
  • व त्याच वर्षी 1973 लोकेडीव, मिनिकॉय व अमडवी व लक्षद्वीप हे नाव देण्यात आले.
  • 1992 मध्ये दिल्ली ला NCR हे नाव देण्यात आले. याला NCT (National Capital territory) असेही म्हणतात.
  • 2006 मध्ये उत्तरांचलला उत्तराखंड हे नाव देण्यात आले. पॉडेचेरीला पुड्डुचेरी हे नाव देण्यात आले तर   
  • 2011 ला ओरिसा ला ओडिशा हे नाव देण्यात आले.
  • 2017 पासून पश्चिम बंगाल ला बंगाल नाव देण्यात आले.

कलम 2

नवीन राज्यांची स्थापना व संघामध्ये स्विकार

कलम 3

 नवीन राज्यांची निर्मिति क्षेत्रामध्ये बदल, नवमध्ये बदल याची तरतूद

कलम 4 :- कलम 2 व कलम 3 ची पध्यत कलम 4 मध्ये दिलेली आहे.

विधानसभा – आमदार       दिल्ली – खासदार राज्यसभा – 250 

नवीन  राज्य बनवण्याची पद्धत :-

नवीन राज्य बनवण्याचे विधेयक संसदेत मांडले जाई या अगोदर हे विधेयक सादर करण्याची पूर्वपरवानगी राष्ट्रपतिकडून घ्यावी लागेल. परवानगी प्राप्त झाल्यावर हे विधेयक कोणत्याही एका घरात टाकले जाई. तिथे पारित झाल्यानंतर त्या विधेयकाला मधील तरतूद संबंधीत विधानसभेकडे पाठविले जाते ती विधानसभा त्यावर कोणताच अधिकार दाखवू शकणार नाही. तिला फक्त विधेयक बघन्याचा अधिकार आहे. त्यानंतर ते विधेयक दुसऱ्या घरातही केल्या जाते.

 जेव्हा दोन्ही घरात पारित झाल्यावर राष्ट्रपति त्यावर त्यावर स्वाक्षरी करण्यास बाध्य असतो. स्वाक्षरी झाल्यावर  राज्याची निर्मिति केली जाते.

टीप :- Supreme Court च्या आदेशानुसार घ. दु. विधेयकच्या अंतर्गत नविन राज्याची निर्मितिला टाकल्या जात नाही.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *