pulitzer-prize
pulitzer-prize

न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘पुलित्झर पारितोषिक 2019’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या पत्रकारिता संस्थांनी पुलित्झर पारितोषिक पटकावले आहेत.

इतर प्रवर्गातले पुरस्कार विजेते:-

1)लोकसेवा – ‘द साऊथ फ्लोरिडा सन सेटिंनल

2)ब्रेकिंग न्यूज – पिट्सबर्ग पोस्ट गॅझेट

3)ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी – रॉयटर्स

4)कथा – रिचर्ड पॉवर्स (द ओव्हरस्टोरी कथेसाठी)

5)नाटक – जॅकी सिब्लिस ड्ररी

6)इतिहास – डेव्हीड ब्लाइट (“फ्रेड्रिक डग्लस – प्रॉफेट ऑफ फ्रीडम” या पुस्तकास)

7)जीवनचरित्र – जेफ्री स्टेवर्ट (“द न्यू नेग्रो – द
लाइफ ऑफ अलेन लॉकी” या पुस्तकासाठी)

8)कविता – फॉरेस्ट गँडर (“बी विथ” या काव्यसंग्रहासाठी)

9)ललित लेखन – एलिझा ग्रिसवोल्ड (“अॅमिटी )

10)अँड प्रॉस्परिटी – वन फॅमिली अँड द फ्रॅक्चरिंग ऑफ अमेरिका” या पुस्तकासाठी)

11)संगीत – एलेन रीड (‘प्रिझ्म’ या रचनेस)

12)आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार – असोसिएटेड प्रेस (येमेन युद्धाच्या वार्ताकनासाठी)

13)आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार – रॉयटर्स

(म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी वार्ताकनासाठी)

अरेथा फ्रँकलिन यांना संगीतात विशेष मानपत्र देण्यात आले.

मेरीलँड येथील 2018 सालाच्या गोळीबारात पाच कर्मचारी गमावलेल्या अॅनापोलिसच्या ‘कॅपिटल गॅझेट’ वृत्तपत्राला गौरवण्यात आले.

पुरस्काराविषयी:-

जोसेफ पुलित्झर हे त्यांच्या काळातले अमेरिकेचे एक प्रसिद्ध पत्रकार होते. त्यांच्या मृत्युपत्रानुसार, उत्तम लिखाणास प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने 1917 साली पुलित्झर पारितोषिकाची स्थापना करण्यात आली.

पत्रकारितेमध्ये चार, पत्र आणि नाटक प्रवर्गात चार, शिक्षण प्रवर्गात एक पुरस्कार आणि सोबतच पाच शिष्यवृत्त्या दिल्या जातात. हा पुरस्कार अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जातो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.