देशबंधू चित्तरंजन दास
देशबंधू चित्तरंजन दास

हे पृष्ठ 5 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 5 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

सुसान अँथनी
सुसान अँथनी

१९५१ : बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन ’पश्चिम रेल्वे’ची स्थापना करण्यात आली.

१९४५ : कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१८७२ : महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

विष्णूदास भावे
विष्णूदास भावे

१८४३ : विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

१८२४ : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

१८१७ : इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

करण थापर
करण थापर

१९५५ : करण थापर – पत्रकार

१९३० : अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: ४ मार्च २०११)

१९२९ : प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)

१९१७ : बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)

बनारसी दास गुप्ता
बनारसी दास गुप्ता

१९१३ : विवियन ली – ब्रिटिश अभिनेत्री (मृत्यू: ८ जुलै १९६७)

१९०८ : प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)

१८८५ : विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)

१८७० : देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले. (मृत्यू: १६ जून १९२५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

भूपेन हजारिका
भूपेन हजारिका

२०११ : भूपेन हजारिका – संगीतकार व गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

१९९१ : शकुंतला विष्णू गोगटे – कथालेखिका व कादंबरीकार. त्यांच्या ’किती रंगला खेळ’, ’चंदनाची उटी’, ’कशाला उद्याची बात’ इ. पन्नास कादंबर्‍या आणि ’झपूर्झा’, ’सावलीचा चटका’, ’मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. (जन्म: ? ? १९३०)

१९५० : फैयाज खाँ – हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी ’प्रेमपिया’ या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या. (जन्म: ? ? १८८०)

सर फिरोजशहा मेहता
सर फिरोजशहा मेहता

१९१५ : सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)

१८७९ : जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.))

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.