४ नोव्हेंबर दिनविशेष - 4 November in History
४ नोव्हेंबर दिनविशेष - 4 November in History

हे पृष्ठ 4 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 4 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

पं. भीमसेन जोशी
पं. भीमसेन जोशी

१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

१९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली

१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या

१९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश

१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’नाट्यगौरव पुरस्कार’ डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

बराक ओबामा
बराक ओबामा

२०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना ’आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ जाहीर

२००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६१८: औरंगजेब – सहावा मुघल सम्राट (मृत्यू: ३ मार्च १७०७)

१८४५: वासुदेव बळवंत फडके – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)

१८७१: शरदचंद्र रॉय – मानववंशशास्त्रज्ञ. १९१२ ते १९३९ या दरम्यान ओरिसा बिहारमधील जमातींचा अभ्यास करुन त्यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध व सात ग्रंथ लिहीले. (मृत्यू: ? ? १९४२)

सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन
सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन

१८८४: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

१८९४: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (मृत्यू: १० मार्च १९७१)

१८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)

१९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)

१९२५: ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)

शकुंतलादेवी – गणितज्ञ
शकुंतलादेवी – गणितज्ञ

१९२९: शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)

१९२९: जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (मृत्यू: १२ सप्टेंबर १९७१)

१९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)

१९३४: विजया मेहता – दिग्दर्शिका

१९३९: चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.

तब्बू
तब्बू

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

१९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

१९७१: तब्बू – अभिनेत्री

१९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९७०: पं. शंभू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक (जन्म: ? ? १९१०)

१९९१: पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले. (जन्म: १२ जून १८९४)

१९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)

१९९५: यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १ मार्च १९२२)

दिलीप परदेशी
दिलीप परदेशी

१९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.

१९९९: माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: १८ एप्रिल १९५८)

२००५: सदाशिव मार्तंड गर्गे – समाजविज्ञान कोशकार (जन्म: ? ? ????)

२०११: दिलीप परदेशी – नाटककार व साहित्यिक (जन्म: ? ? ????)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *