१८ एप्रिल दिनविशेष - 18 April in History
१८ एप्रिल दिनविशेष - 18 April in History

हे पृष्ठ 18 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 18th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक वारसा दिन

जागतिक वारसा दिन (World Heritage Day)

झिम्बाब्वे स्वातंत्र्य दिन

इराण सेना दिन

महत्त्वाच्या घटना:

१३३६: दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.

१३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्‍हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.

१८३१: ’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.

१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

१८९८:  जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी

१९१२: टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.

१९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना. हा राज्यातील पहिला शिवपुतळा. या पुतळ्याचे अनावरण मंदिराचे देणगीदार दिवंगत गणेश गोखले यांचे चिरंजीव डॉक्टर महादेव गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

१९५०: आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.

२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७७४:  सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म (मृत्यू: २७ आक्टोबर १७९५)

१८५८: महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ – मुरुड)

१९०१: भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी व प्रशासक चंदेश्वर नारायण प्रसाद सिंह यांचा जन्मदिन.

१९१०: विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.

१९१६: ललिता पवार – अभिनेत्री (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९८)

१९६२: पूनम धिल्लन – अभिनेत्री

१९५८: माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९)

क्रांतीवीर तात्या टोपे
क्रांतीवीर तात्या टोपे

१९९१: डॉ. वृषाली करी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८५९: क्रांतीवीर तात्या टोपे (रामचंद्र पांडुरंग टोपे).

१८९८: चाफेकर बंधू.

१९४५: व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८४९)

चाफेकर बंधू
चाफेकर बंधू

१९५५: अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९५९: लोकप्रिय भारतीय क्रांतीकारक व पत्रकार बरिंद्र कुमार घोष  यांचे निधन.

१९६६: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८८३ – डभई, गुजराथ)

१९७२: पांडूरंग वामन काणे.

१९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन.

१९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२ – जयपूर)

२००१: प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि भूगोल आदी विषयातील पार्श्वभूमी असलेले नार्वेशियान लेखक थोर हेयरडाल यांचे निधन.

२००२: नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल, मानववंशशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१४)

२००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचे निधन.

२००३: भारतीय ‘हिंदी साहित्यिक व साहित्यकार’  सुधाकर पाण्डेय यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *