कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक
कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक

हे पृष्ठ 9 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 9 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

साहित्यिक गंगाधर गाडगीळ

२००० : उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना

२००० : न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

१९९७ : साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान

थिओडोर रुझव्हेल्ट

१९६५ : इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

१९६० : रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. ’फोर्ड’ आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.

१९५३ : कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४७ : भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

१९३७ : जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९०६ : आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

पायल रोहतगी

१९८० : पायल रोहतगी – अभिनेत्री व मॉडेल

१९३४: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)

१९३१ : एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)

एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित

१९२४ : पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (मृत्यू: १० जानेवारी २००२)

१९०४ : पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: १८ मे १९६६)

१८७७ : सर मुहम्मद इक्‍बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

के. आर. नारायणन

२०११ : हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ९ जानेवारी १९२२)

२००५ : के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (जन्म: २७ आक्टोबर १९२०)

१९७७ : केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक. ’अमृतमंथन’, ’संत तुकाराम’, ’ कुंकू’, ’माझा मुलगा’,’ संत ज्ञानेश्वर’, ’संत सखू’ आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. ’एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी ’वसुंधरा’ या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत. (जन्म: २३ मे १८९६)

हर गोविंद खुराना

१९७० : चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)

१९६७ : नटवर्य बाबूराव पेंढारकर (जन्म: ? ? १८९७)

१९६२ : महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (जन्म: १८ एप्रिल १८५८)

१९५२ : चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)

१९४० : नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १८ मार्च १८६९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *