२० डिसेंबर दिनविशेष - 20 December in History
२० डिसेंबर दिनविशेष - 20 December in History

हे पृष्ठ 20 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 20 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

मानवी ऐक्यभाव दिन.

मानवी ऐक्यभाव दिन

महत्त्वाच्या घटना:

१८७६: ला राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे लिखाण बकिमचंद्र चटर्जी यांनी पूर्ण केले.

१९२४: हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.

१९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू

१९४६: ला महात्मा गांधी एक महिन्यासाठी श्रीरामपूर येथे थांबले होते.

१९५५: ला भारतीय गोल्फ संघटनेचे गठन करण्यात आले.

१९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९८५: ला तिरुपती बालाजी येथील भगवान वेंकटेश्वर च्या मूर्तीला २.५ करोड रुपयांचे मुकुट चढविल्या गेले.

१९८८: ला भारताच्या लोकसभेमध्ये मतदानाचे वयवर्ष २१ वरून १८ करण्यासाठी नवीन कायदा मंजूर झाला.

राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा
राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा

१९९१: ला पॉल कीटिंग हे ऑस्ट्रेलिया चे नवीन प्रधानमंत्री बनले.

१९९३: ला भारत आणि सोवियत संघामध्ये ब्रुसेल्स येथे सहकार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

१९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान

१९९९: पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.

२०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)

१८९०: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अ‍ॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. (मृत्यू: २७ मार्च १९६७)

१९०१: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १६ जानेवारी १९६७)

१९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०००)

१९१७: नाट्यगृहांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शांता गांधी यांचा जन्म.

१९२७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचा जन्म.

१९३६: प्रसिद्ध साहित्यकार रॉबिन शॉ यांचा जन्म.

राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश
राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश

१९४०: यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री (१९६७)

१९४२: राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)

१९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)

१९६०: उत्तराखंड चे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा जन्म.

१९७०: हिंदी चित्रपट अभिनेता सोहेल खान यांचा जन्म.

१९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७३१: छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा (जन्म: ४ मे १६४९)

१९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)

१९३३: विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. (जन्म: २२ मे १८७१)

१९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)

१९८१: भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार कानू रॉय यांचे निधन.

१९९३: वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार (जन्म: ????)

दगडू मारुती तथा ’दया’ पवार
दगडू मारुती तथा ’दया’ पवार

१९९६: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.))

१९९६: दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)

१९९८: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

२००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)

२००९: महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक अरुण कांबळे यांचे निधन.

२०१०: नलिनी जयवंत – अभिनेत्री (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)

२०१०: सुभाष भेंडे – लेखक (जन्म: १४ आक्टोबर १९३६)

२०१०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *