हे पृष्ठ 12 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
१२ मे दिनविशेष
On this page, we will list all historical events that have occurred on 12th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- जागतिक परिचारिका दिन
महत्त्वाच्या घटना:
१३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.
१४५९: राठोड कुळातील राजपूत प्रमुख राव जोधा यांनी जोधपूर शहराची स्थापना केली.
१५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
१६६६: आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजीमहाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झली.
१७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
१९०९: पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना
१९१५: भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस यांनी जपानी नौका सानुकी मारू यातून प्रवास करून भारत देश सोडून जपान येथे आश्रय घेतला.
१९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले.
१९५२: प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
१९५२: गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.
१९५५: दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
१९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
१९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
१९९८: केन्द्र सरकारी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
१९९८: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
२००८: चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.
२०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८२०: फ्लोरेंस नाइटिंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.
१८७५: भारतीय हिंदू धर्माचे गाढे गाढे अभ्यासक व कलकत्ता विद्यापीठाचे तत्त्वज्ञ कृष्णचंद्र भट्टाचार्य यांचे निधन.
१८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)
१८९९: ईंद्रा देवी, भारतीय योगी.
१९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)
१९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३)
१९०७: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३)
१९२६: भारतीय जनता पक्षाचे माजी कोषाध्यक्ष व राजकारणी तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे २२ वे राज्यपाल वीरेंन जे. शाह यांचा जन्मदिन.
१९३०: तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
१९३३: नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.
१९४५: भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोनाकुप्पाकटील गोपीनाथन बाळकृष्णन यांचा जन्मदिन.
१९५४: भारतीय राजकारणी आणि तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री करुप्पा गौंडर पलानीस्वामी यांचा जन्मदिन.
१९८९: भारतीय क्रिकेटपटू शिख पांडे यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८०९: ब्रिटिश भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि व्हिक्टोरिया क्रॉसचे प्राप्तकर्ता जनरल सर ह्यू हेनरी गफ यांचे निधन.
१९७०: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९१)
१९९३: भारतीय हिंदी भाषिक कवी शमशेर बहादूर सिंग यांचे निधन.
२०१०: तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
२०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)
१९६६ ला आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांची भेट?
१९६६ ? काय भांग पिऊन पोस्ट लिहिलीय का ? MPSC सोडा तुमच्या सनावळ्यांनी कारकुन पण होणार नाही कोण !
होय, एक मोठी चूक. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे.