मेंदू  (Brain):

शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूद्वारेच नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात. आपल्या मेंदूची डावीबाजू शरिराच्या  उजव्या बाजूला नियंत्रित करते.

आयुष्यभराच्या कालखंडात आपल्या शरीरातील इतर कुठल्याही अवयवापेक्षा मेंदूमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. पहिला श्वास घेते वेळी आपल्या मेंदूला आठ महिने पूर्ण झालेले असतात.

मेंदू हा कवटीत बसविलेला असतो. मेंदू व मज्जारज्जू यांवर तीन आवरणे असतात. ते मस्तिष्क आवरणे म्हणून ओळखले जातात.

१) वराशिका (Dura Mater): मेंदूचे संरक्षण करने.

२) निशारीका (Arachnoid Mater): मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यात असतात.

३)चिनांशुका (Pia Mater): यात Cerebro Spinal Fluid नावाचे द्रव्य असते.  हे द्रव्य अपघाताच्या वेळी बाह्य धक्का शोषून घेऊन मेंदूचे धक्क्यापासून संरक्षण करते. त्याचबरोबर हे द्रव्य मध्यवर्ती चेतासंस्थेला पोषकद्रव्येही पुरवितो.

मेंदूची रचना:

 • प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन साधारणपणे तीन पाउंड्स (1300-1400 ग्रॅम) (1 Pound = 453 ग्रॅम)
 • पुरुषांच्या मेंदूचे वजन 1260 ग्रॅम तर महिलांच्या मेंदूचे वजन 1130 ग्रॅम असते.
 • मानवी मेंदू चेतापेशी (न्युरॉन्स), ग्लीअल पेशी आणि रक्तवाहिन्यांच्या बनलेल्या असतात.
 • मेंदूतील चेतापेशींची संख्या 10,000 दशलक्ष (200 बिलियन) एवढी असून त्यांच्यात सुमारे 125 ट्रिलियन संपर्कस्थान (Synapse) असतात.

मेंदूची विभागणी तीन भागात केली जाते.

 • प्रमस्तिष्क/ अग्रमस्तिष्क (Cerebrum/ Fore Brain)
 • मध्यमस्तिष्क /अनु- मस्तिष्क (Cerebellum/Hind Brain)
 • मस्तिष्क -पुच्छ (Medulla Oblongata/ Mid Brain)

प्रमस्तिष्क/ अग्रमस्तिष्क (Cerebrum/ Fore Brain):

 • प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धाच्या बनलेला असतो.
 • प्रमस्तिष्काचे बाह्यआवरण म्हणजेच वलकुट अनियमित घड्या/ वळ्या आणि खाचा यांचे बनलेले असते. त्यांना संवलन (Convolutions) असे म्हणतात.

कार्य:

 • शरीरातील सर्व ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण करणे.
 • सर्व मानसिक क्रियांचे नियंत्रण करणे.
 • ज्ञानेंद्रियांशी संबंधित आकलनाचे नियंत्रण

मध्यमस्तिष्क /अनु- मस्तिष्क (Cerebellum/Hind Brain):

 • यास लहान मेंदू असेही म्हणतात.
 • मध्य-मस्तिष्क हे प्रमस्तिष्काच्या मागे कर्परगुहेच्या पश्चभागात असतात.
 • मध्यमस्तिष्काला प्रमस्तिष्कापासून अनुप्रस्थ विदर वेगळे करते.

कार्य:

 • स्नायूंच्या कार्याचे नियमन
 • शरीराच्या ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे.
 • धावणे, चालणे, विविध वस्तू हाताळणे इ. क्रिया नियंत्रित करणे.
 • मध्य-मस्तिष्कातील पिंडचतुष्क (Corpora-Quadrigemina) हा भाग दृश्य संवेदनाचे वहन करतो.

मस्तिष्क -पुच्छ (Medulla Oblongata/ Mid Brain):

 • हा मेंदूचा सर्वात पुच्छबाजूचा भाग असून सुमारे 3 मि. मी. लांब असतो.
 • यांच्या समोरील बाजूस दोन त्रिकोणाकृती उंचवटे असतात त्यांना पिरॅमिड असे म्हणतात.
 • याच्या शेवटच्या टोकाचे रूपांतर चेतारज्जूत झालेले असते.

कार्य:

 • शरीरातील अनैच्छिक हालचालींचे नियंत्रण करणे
 • हृदयाचे कार्य, फुफ्फुसांचे कार्य, रक्तप्रवाह, अन्ननलिकेचे कार्य.

चेतारज्जू (मेरूरज्जू) (Spinal Cord):

 • चेतारज्जू (मेरूरज्जू) मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरुस्तंभामध्ये आढळतो.
 • चेतारज्जू चे शेवटचे टोक तंतुमय धाग्यासारखे असल्याने त्याला अंत्यतंतू (Filum Terminale) असे म्हणतात.
 • चेतारज्जू परिघीय चेतासंस्थेला मेंदूशी जोडतो.
 • चेतारज्जू त्वचा, कां या सारख्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे संवेदनांचे वहन करण्याचे कार्य करतात तसेच मेंदूकडून प्रतिसादाचे वहन स्नायू आणि ग्रंथी यांसारख्या अवयवांकडे करतात.
 • चेता रज्जू शरीरातील प्रतिक्षिप्त क्रियांमध्ये समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतात.

चेतापेशी (Nerve Cells):

चेतापेशी ही चेतासंस्थेचे संरचनात्मक आणि कार्यात्मक घटकांचे मूलभूत एकक आहे. रचनेनुसार चेतापेशींचे ३ प्रकार पडतात.

 1. बहुध्रुवीय (Multipolar) : बहुध्रुवीय चेतापेशी केंद्राकयुक्त पेशीकाय (Cellbody), वृक्षिका (Dendrites) आणि अक्षतंतू (Axon) यांची बनलेली असते.
 2. द्विध्रुवीय (Bipolar): डोळ्यातील दृष्टिपटलात द्विध्रुवीय प्रकारच्या चेतापेशी असतात.
 3. आभासी एकध्रुवीय (Pseudo Unipolar).: या चेतापेशींना एकाच आखूड प्रवर्ध असतो.

चेतापेशी एकमेकांना जुळलेल्या असतात, मात्र त्यांच्यात 2-20nm इतके सुक्ष्मदर्शकीय अंतर असते. त्याला संपर्क स्थान (Synapse) असे म्हणतात.

चेतापेशींच्या कार्यानुसार त्यांचे तीन प्रकार पडतात.

 1. संवेदी चेतापेशी (Sensory Nerves): या चेतापेशींद्वारे त्वचा, नाक, कान यांसारख्या ज्ञानेंद्रियांकडून आवेगाचे वहन मज्जारज्जू किंवा मेंदूकडे केले जातात.
 2. प्रेरक चेतापेशी (Motor Nerves):  मेंदू किंवा मज्जारज्जूकडून स्नायू आणि ग्रंथी यांसारख्या प्रेरकांकडे आवेगाचे वहन करतात.
 3. सहयोगी चेतापेशी ( Association Nerves):   चेतासंस्थेच्या एकात्मिचे कार्य करतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *