८ ऑगस्ट दिनविशेष - 8 August in History
८ ऑगस्ट दिनविशेष - 8 August in History

हे पृष्ठ 8 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ८ ऑगस्ट  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 8 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

१. International Infinity Day
२. International Cat Day

महत्त्वाच्या घटना:

१५०९: कृष्णदेव राय हे विजयनगर चे सम्राट बनले.

१६४८: स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.

१९०८: विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.

१९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.

१९४९: भुतानच्या राष्ट्राची स्थापना.

१९६३: इंग्लंडमधे १५ जणांचा टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.

रिचर्ड निक्सन
रिचर्ड निक्सन

१९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.

१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.

१९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.

१९८८: म्यानमारच्या राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.

१९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.

१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

२०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ’महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर

२००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

दिलीप सरदेसाई
दिलीप सरदेसाई

१०७८: होरिकावा – जपानी सम्राट (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)

१८७९: डॉ. बॉब स्मिथ – ’अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’चे एक संस्थापक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)

१९०२: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० आक्टोबर १९८४)

१९०८: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत गायिका सिद्धेश्वरी देवी यांचा जन्मदिन.

१९१२: तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४)

१९१२: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)

१९१५: पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचा जन्मदिन.

१९२५: डॉ. वि. ग. भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार (१९७३ – १९७५), पद्मश्री (मृत्यू: ? जून २००६)

दादा कोंडके
दादा कोंडके

१९२६: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. (मृत्यू: ३० जुलै १९९४)

१९३२: दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक (मृत्यू: १४ मार्च १९९८)

१९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१४)

१९४०: दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७)

१९५०: प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी यांचा जन्म.

१९५२: भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव यांचा जन्म.

१९४८: भारतीय राजकारणी व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य कपिल सिब्बल यांचा जन्मदिन.

१९६८: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला यांचा जन्म.

१९८१: रॉजर फेडरर – स्विस लॉन टेनिस खेळाडू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८२७: जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७०)

१८९७: व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ सप्टेंबर १८४८)

१९९८: डॉ. सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार. त्यांनी ’सीमारेषा’, ’अनुहार’, ’मेघमल्हार’, ’वृंदा’, ’युगंधरा’, ’महाश्वेता’ आदी चौदा कादंबर्‍या दोन नाटके व काही कथा लिहिल्या. (जन्म: ? ? १९१५)

१९९९: गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

२०००: भारतातील कर्नाटक इथील एकीकरण चळवळीत महत्वाची भूमिका बजावणारे कर्नाटकचे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *