७ ऑगस्ट दिनविशेष - 7 August in History
७ ऑगस्ट दिनविशेष - 7 August in History

हे पृष्ठ 7 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ ऑगस्ट  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 7 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७५३: साली ब्रिटीश वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली.

१७८९: अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.

१९४२: दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ’ग्वाडेल कॅनाल’ येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.

१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या ’कॉन टिकी’ या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.

१९४७: मुंबई महानगरपालिकेने ’बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.

१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर ’द वॉशिंग्टन स्टार’ हे वृत्तपत्र बंद पडले.

गौतम घोष
गौतम घोष

१९८५: जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.

१९८७: अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.

१९९०: गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.

१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी

संकल्प मोदवल
संकल्प मोदवल

१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा ’व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर

१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.

२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८३१: चर्च ऑफ इंग्लंडचे एक मौल्यवान, शालेय शिक्षक आणि लेखक तसचं, केंब्रिज अ‍ॅपोस्टल्स सीक्रेट सोसायटीचे सदस्य फ्रेडरिक फरार(Frederic Farrar) यांचा जन्मदिन.

अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार
अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार

१८७१: अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका, जलरंगातील त्यांचे वेगळे निर्मितीतंत्र हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)

१८७६: माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर (मृत्यू: १५ आक्टोबर १९१७)

१९०४: प्रसिद्ध भारतीय इतिहास, सांस्कृतिक कला व साहित्याचे विद्वान वासुदेव शरण अग्रवाल यांचा जन्मदिन.

१९१२: केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ (मृत्यू: ? ? ????)

डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन
डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन

१९२५: डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन – भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री, हरित क्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जगभरातील सुमारे ४२ विद्यापीठांनी त्यांना ’डॉक्टरेट’ ही पदवी दिली आहे. याखेरीज पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या सन्मानांखेरीज, रॅमन मॅगसेसे, वर्ल्ड फूड प्राइझ व इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.

१९३६: दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म.

१९४८: ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९६६: विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर

१८४८: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)

१९३४: जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १७५२)

१९४१: रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन …’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१)

१९७४: अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ? ? ????)

२००९: भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतकार आणि अभिनेते गुलशन बावरा यांचे निधन.

२०१८: भारतीय लेखक आणि राजकारणी तसचं, तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *