हे पृष्ठ 20 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 20 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- लोकशाही दिन
- सद्भावना दिन
- जागतिक डास दिन (World Mosquito Day)
- भारतीय अक्षय ऊर्जा दिन (Indian Akshay Urja Day)
- International Day Of Medical Transporters
- Virtual Worlds Day
महत्त्वाच्या घटना:
१६६६: शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी ’नरवीर घाटी’ हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
१८२८: राजा राम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे ’ब्राम्हो समाज’ म्हणू लागले.
१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. आल्मोडा येथे मलेरियावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.
१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१९२०: डेट्रॉइट, मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली. यातल्या ज्यूंना छळ छावण्यात रवाना करण्यात आले.
१९६०: सेनेगलने आपण (मालीपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९८८: इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.
२००८: भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७७९: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८)
१८३३: बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १३ मार्च १९०१)
१८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)
१९१५: भारतीय राजकारणी व दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याचे आठवे मुख्यमंत्री डी. देवराज उर्स यांचा जन्मदिन.
१९१७: पुरोगामी कवितांचे प्रसिद्ध कवी त्रिलोचन शास्त्री यांचा जन्मदिन.
१९४०: पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, शांततेचा नोबल पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हवामान बदलांच्या आंतर-सरकारी पॅनेलचे अध्यक्ष राजेंद्र कुमार पचौरी यांचा जन्मदिन.
१९४१: स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (मृत्यू: ११ मार्च २००६)
१९४४: राजीव गांधी – भारताचे ६ वे पंतप्रधान, भारतरत्न (१९९१) मरणोत्तर (मृत्यू: २१ मे १९९१)
१९४६: एन. आर. नारायण मूर्ती – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक
१९८६: अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९१४: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उडिया भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार गोपीनाथ महंती यांचा जन्मदिन.
१९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)
१९८४: रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार‘ व ‘मी पाहिलेला रशिया‘ ही पुस्तके लिहिली आहेत. (जन्म: २४ मे १९२४)
१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरूद्वारात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. (जन्म: २ जानेवारी १९३२)
१९८८: माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. ’कन्यादान’, ’धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ’शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांचे मायेचा पाझर, संसार [उर्मिला मातोंडकरचा पहिला चित्रपट] हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. (जन्म: ? ? ????)
१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.
१९९७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (जन्म: ७ आक्टोबर १९०७)
२०००: प्राणलाल मेहता – चित्रपट निर्माते (किनारा, किताब, बेजुबान, मरते दम तक, पुलिस पब्लिक) (जन्म: ? ? ????)
२००१: मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)
२०१३: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांची पुणे येथे गोळ्या घालुन हत्या (जन्म: ? ? ????)
२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)