२१ ऑगस्ट दिनविशेष - 21 August in History
२१ ऑगस्ट दिनविशेष - 21 August in History

हे पृष्ठ 21 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 21 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • International Day Of Remembrance And Tribute To The Victims
  • Internet Self-Care Day
  • World Senior Citizen’s Day

महत्त्वाच्या घटना:

लिओनार्डो-द-व्हिन्सी
लिओनार्डो-द-व्हिन्सी

१८४१: जॉन हॅम्प्टन यांनी व्हेनेशियन शैलीच्या खिडकीचे पेटंट केले.

१८८८: विल्यम बरोज याने बेरजा मारणार्‍या यंत्राचे पेटंट घेतले.

१९११: पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ’मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

१९१५: पहिल्या महायुद्धा दरम्यान इटलीने तुर्की विरुद्ध युद्धाची घोषणा केली.

मोनालिसा
मोनालिसा

१९३८: इटली देशांतील शाळांमध्ये ज्यू शिक्षकांवर बंदी घालण्यात आली.

१९६५: रोमानियाने संविधान स्वीकारले.

१९७२: वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली.

१९८८: भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले.

१९९१: लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.

१९९३: मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या ‘मार्स ऑब्झर्व्हर’ या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७६५: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २० जून १८३७)

१७८९: ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ (मृत्यू: २३ मे १८५७)

१८७१: गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)

१९०५: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)

१९०७: भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)

१९०९: नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी (मृत्यू: १० मे २०००)

श्रीपाद अच्युत दाभोळकर
श्रीपाद अच्युत दाभोळकर

१९१०: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)

१९१५: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखक, आणि चित्रपट निर्माता इस्मत चुग़ताई यांचा जन्मदिन.

१९२२: अमेरिकन खजिनदार शोधक आणि मेल फिशर मरीन हेरिटेज म्युझियमचे संस्थापक मेल फिशर यांचा जन्मदिन.

१९२४: श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (मृत्यू: ३०एप्रिल २००१)

१९२७: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी राजकारणी आणि उत्तरप्रदेश, उडीसा आणि पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचा जन्मदिन.

१९३४: सुधाकरराव नाईक – प्रसिद्ध भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य तसचं, महाराष्ट्र राज्याचे माजी १३ वे मुख्यमंत्री (मृत्यू: १० मे २००१)

व्ही. बी. चन्द्रशेखर
व्ही. बी. चन्द्रशेखर

१९३९: बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगे यांचा जन्म.

१९६१: व्ही. बी. चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज

१९७१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा जन्मदिन.

१९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.

१९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.

१९८६: उसेन बोल्ट – जमैकाचा धावपटू. यांनी अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केली आहेत.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ
बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ

१९३१: ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)

१९४०: लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)

१९४७: बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)

१९७६: पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer),

१९७७: प्रेमलीला ठाकरसी – एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू

विनू मांकड
विनू मांकड

१९७८: विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज. पहिल्या क्रमांकापासून ते अकराव्या क्रमांकापर्यंत सर्व क्रमांकांवर फलंदाजी करण्याचा विक्रम. अशी कामगिरी करणारे फक्त तीनच खेळाडू आहेत. सर्वात कमी कसोटी (२३) सामन्यांमध्ये १००० धावा व १०० बळी घेण्याचा विक्रम. हा विक्रम बरीच वर्षे अबाधित होता. पुढे इंग्लंडच्या इयान बोथम यांनी २१ कसोटी सामन्यात ही कामगिरी करून तो विक्रम मोडला. एका कसोटी सामन्यात १० बळी घेणारे पहिले भारतीय गोलंदाज. १९५६ मध्ये पंकज रॉय बरोबार न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांची भागीदारी केली. हा विक्रम ५२ वर्षे अबाधित होता. नॉन स्ट्रायकर एन्डला असणारा ऑस्ट्रेलियाचा बिल ब्राऊन हा सारखा क्रीजच्या बाहेर जात असल्यामुळे मांकड यांनी त्याला धावबाद केले. बाद करण्यापूर्वी मांकड यांनी त्याला दोनदा ताकीद दिली होती. या नियमाला पुढे Mankading असे नाव पडले. १९४७ चे विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर. (जन्म: १२ एप्रिल १९१७)

१९८१: आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ – १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक
(जन्म: १ डिसेंबर १८८५ – सातारा, महाराष्ट्र)

१९९१: गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक (जन्म: २० एप्रिल १९१४)

सुब्रमण्यम चंद्रशेखर
सुब्रमण्यम चंद्रशेखर

१९९५: सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक व गणिती. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील (Black Holes) संशोधनासाठी खर्च केला. यांचे काका सी. व्ही. रामन यांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९३०) मिळाले आहे. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे हे दोघेच भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला. (जन्म: १९ आक्टोबर १९१०)

शरद तळवलकर
शरद तळवलकर

२०००: निर्मला गांधी – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्‍नुषा (जन्म: ? ? ????)

२०००: विनायकराव कुलकर्णी – स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)

२००१: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर (जन्म: ? ? ????)

२००१: शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)

२००४: भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)

२००६: बिस्मिला खाँ – भारत रत्न, पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शहनाई वादक (जन्म: २१ मार्च १९१६)

२००७: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखिका क़ुर्रतुलऐन हैदर यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *