१ नोव्हेंबर दिनविशेष - 1 November in History
१ नोव्हेंबर दिनविशेष - 1 November in History

हे पृष्ठ 1 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have o१-नोव्हेंबर-दिनविशेष-1-november-historyccurred on 1st November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • मृतक दिन (Kids) – मेक्सिको
  • राष्ट्र दिन – अल्जीरिया
  • स्वातंत्र्य दिन – अँटिगा आणि बार्बुडा
  • राज्य स्थापना दिन – केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा
  • जागतिक वनस्पतीभक्षक दिन

महत्त्वाच्या घटना:

१६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.

१७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.

१७६५: ब्रिटीश वसाहतीत स्टॅम्प कायदा लागू करण्यात आला.

१८००: जॉन एडम्स मध्ये व्हाइट हाऊस मध्ये राहणारे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष झाले.

१८४५: ’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, मुंबई येथे सुरू झाले.

१८४८ : महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

१८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.

१८८१: कलकत्तामध्ये, मध्ये स्यालदाह आणि अर्मेनिया घाट दरम्यान ट्राम सेवा सुरू झाली.

१८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.

१९०३: पनामाच्या जनतेचा संघर्ष यशस्वी झाला आणि हा देश पूर्णपणे स्वतंत्र झाला.

१९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

१९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.

१९३१: स्वातंत्र्यसैनिक तारकनाथ दास यांनी मध्ये कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को शहरात गदर आंदोलन सुरू केले.

१९४४: दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीश सैन्य नेदरलँड्सच्या वॉलचेरिन येथे दाखल झाले.

१९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९४६: पश्चिम जर्मनीचे निदरसचसेन राज्य स्थापन झाले.

१९५२: जय नारायण यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

१९५६: केरळ राज्य स्थापना दिन

१९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

१९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती

१९५६: हैदराबाद राज्य प्रशासकीय दृष्ट्या संपुष्टात आले.

१९५६: निजलिंगप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.

१९५६: पंडित रविशंकर शुक्ला यांनी मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

१९५६: कर्नाटक राज्याची स्थापना.

१९५६: नीलम संजीवा रेड्डी यांनी मध्ये आंध्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.

१९५६: राजधानी दिल्ली केंद्रशासित प्रदेश बनली.

१९५६: बेझवाडा गोपाळ रेड्डी यांची आंध्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

१९५६: भाषेच्या आधारे मध्ये मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली.

कवी नारायण सुर्वे
कवी नारायण सुर्वे

१९५६: भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.

१९५६: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.

१९५६: द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती

१९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

१९६६: चंदीगड राज्याची स्थापना.

१९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.

१९७३: ‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.

१९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप’ असे ठेवण्यात आले.

१९७९: बोलिव्हियात सत्तेवर सैन्याचा ताबा.

१९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली. होंडा मोटार कंपनीने मेरिज्‌व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अ‍ॅकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.

१९८४:  भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात मध्ये शीखविरोधी दंगली पेटल्या.

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील

१९९३: औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.

१९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड

१९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कबीर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर

२०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

२०००: छत्तीसगड राज्याची स्थापना झाली.

२००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

१८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.

१८९३: इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ १८७३ : – कोलकता, पश्चिम बंगाल)

१९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)

रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश
रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश

१९२१: शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)

१९२६: यशवंत देव – संगीतकार व गीतकार

१९४०: रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश

ऐश्वर्या राय – अभिनेत्री
ऐश्वर्या राय – अभिनेत्री

१९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

१९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.

१९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.

१९७३: ऐश्वर्या राय – अभिनेत्री

वी. वी. एस. लक्ष्मण – क्रिकेटपटू
वी. वी. एस. लक्ष्मण – क्रिकेटपटू

१९७३: भारतीय अभिनेत्री रुबी भाटिया यांचा जन्म झाला.

१९७३:२ : अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (मृत्यू: २५ सप्टेंबर २००४)

१९७४: वी. वी. एस. लक्ष्मण – क्रिकेटपटू

१९८७: भारतीय अभिनेत्री “इलियाना डिक्रूझ” यांचा जन्म झाला.

२००४: बेनेट किंग मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा पहिला परराष्ट्र प्रशिक्षक बनला.

दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार
दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८७३: दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार (जन्म: ? ? १८२९ – चौबेरिया, गोपाळनगर, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

१९२४: प्रसिद्ध कथा लेखक आणि हिंदी साहित्यिक रामकिणकर उपाध्याय यांचा जन्म मध्ये झाला.

१९३०: उर्दू भाषेचे प्रख्यात लेखक आणि कवी अब्दुल क़ावी देसनावी यांचा जन्म.

१९४२: हिंदी भाषेचे प्रख्यात कादंबरीकार, कवी व स्त्रीवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभा खैतान यांचा जन्म मध्ये झाला.

१९४८: प्रख्यात राजकारणी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री संतोष गंगवार यांचा जन्म मध्ये झाला होता.

१९५०: विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. ’पथेर पांचाली’, ’अपराजित’, ’आरण्यक’ या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. ’इच्छामती’ या त्यांच्या कादंबरीला रविन्द्र पुरस्कार देण्यात आला. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)

१९६४: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा जन्म झाला.

१९८०: भारतातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी असलेले दामोदर मेनन यांचे मध्ये निधन झाले.

१९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

१९९१: अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: ? ? ????)

१९९३: नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका (जन्म: ? ? ????)

१९९४: कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते (जन्म: ? ? ????)

१९९६: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)

२००५: योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्‍या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्‍मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)

२००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

    1. 1 नोव्हेंबरला मृत मुलांचा आणि 2 नोव्हेंबरला मृत प्रौढांचा सन्मान.

      परीक्षेच्या दृष्टिकोनातून – योग्य तारीख २ नोव्हेंबर असावी. तुमच्या माहितीबद्दल धन्यवाद. आम्ही पृष्ठ अद्यतनित केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *