हे पृष्ठ 16 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १६ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 16 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- बांगला देशचा स्वातंत्र्यदिन
- भारतीय विजय दिवस
महत्त्वाच्या घटना:
१४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
१७०७: जपान च्या माउंट फुजी या पर्वतावर या दिवशी शेवटचा ज्वालामुखी उद्रेक झाला होता.
१७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
१८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
१९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
१९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
१९३२: ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४५: जपान चे दोन वेळा राहिलेले प्रधानमंत्री फ्युमिमारो कोनी यांनी आत्महत्या केली होती.
१९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९५१: हैदराबाद चे सालार जंग संग्रहालयाची स्थापना.
१९७१: भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
१९८५: कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
१९९३: दिल्लीला सर्वांसाठी शिक्षण हे चर्चासत्र पार पडले.
२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.
२००७: बांग्लादेश ने पाकिस्तान पासून मुक्तीचा ३६ वा विजय दिवस साजरा केला होता.
२०१४: पाकिस्तान च्या पेशावर येथे दहशदवादी हल्ल्यात १५० लोकांचा जीव गेला होता त्यामध्ये १३४ लहान मुले होती
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७७०: लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७)
१७७५: जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)
१८८२: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
१९१७: सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू: १९ मार्च २००८)
१९३७: भारतीय कुश्तीपटू हवा सिंग यांचा जन्म.
१९५९: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा जन्म.
१९७०: महाराष्ट्राचे लोकसभेचे सदस्य हेमंत श्रीराम पाटील यांचा जन्म.
१९७७: ध्यानचंद यांचे भाऊ आणि हॉकी चे प्रसिद्ध खेळाडू रूपसिंग यांचे निधन.
१९८६: भारतीय गायिका हर्षदीप कौर यांचा जन्म.
१९९३: जगातील सगळ्यात लहान उंचीची महिला ज्योती आमगे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९६०: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
१९६५: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४)
१९८०: कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
२०००: सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: ? ? १८९९)
२००२: भारतीय अभिनेत्री कव्वाल शकीला बानो यांचे निधन.
२००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.
२००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
२०१३: भारतीय क्रिकेटर मधुसूदन रेगे यांचे निधन.