हे पृष्ठ 17 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १७ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 17 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
राइट ब्रदर्स दिवस.
महत्त्वाच्या घटना:
१३९८: मंगोल साम्राज्याचा सम्राट तैमुर पहिला याने दिल्ली वर हल्ला केला होता.
१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
१८०३: इस्ट इंडिया कंपनी ने ओडीसा वर आपला दावा निर्माण केला.
१९०३: राईट बंधू यांनी पहिल्यांदा “द फ्लायर” नावाचे विमान १२ सेकंदांसाठी उडवले होते.
१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९४०: महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला स्थगिती दिली.
१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन
१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७१: आजच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध समाप्त झाले.
२००२: तुर्की ने भारताला काश्मीर मुद्द्यावर समर्थन केले होते.
२००८: शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
२०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
२०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.
२०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
२०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१५५६: सम्राट अकबर च्या दरबारातील प्रसिद्ध कवी रहीम यांचा जन्म.
१७७८: सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ मे १८२९)
१८४९: लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)
१९००: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (मृत्यू: ३ एप्रिल १९९८)
१९०१: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)
१९०५: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ – २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ – १६ डिसेंबर १९७०) (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)
१९११: डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)
१९२४: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)
१९४७: दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
१९७२: जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
१९७८: रितेश देशमुख – अभिनेता
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७४०: चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले. (जन्म: ? ? ????)
१९०७: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४)
१९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१)
१९३३: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
१९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (जन्म: ११ आक्टोबर १८७६ – चांचल, माल्डा, बांगला देश)
१९४५: हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार विजू खोटे यांचा जन्म.
१९५६: पं. शंकररावdabholkar व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८)
१९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८८० – गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
१९६५: जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मdevdatt dabholkarधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९०६)devdatt dabholkar
१९८५: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४)
२०००: जाल पारडीवाला – अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक (जन्म: ? ? ????)
२००१: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)
२००७: प्रसिद्ध गायक हरिओम शरण यांचे निधन.
२००८: केंद्रीय जहाजबांधणी मंत्री वेद प्रकाश गोयल यांचे निधन.
२०१०: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)