हे पृष्ठ 11 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 11 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१८५२: ’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
१९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.
२००१: ’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.
२००१: सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७३७: साली कलकत्ता शहरात विनाशकारी चक्रीवादळ आलं होत.
१८७६: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)
१९०२: ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू: ८ आक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)
१९१०: साली थिओडोर रुझवेल्ट(Theodore Roosevelt) हे विमानात प्रवास करणारे पहिले अमेरिकेचे अध्यक्ष बनले.
१९१६: रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील ’यमुनाजळी खेळू …’ या गाण्यासाठी प्रसिद्ध (मृत्यू: ३ जून १९९७)
१९१६: चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट. (पुणे विद्यापीठ – १९९७), पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)
१९३०: बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक (मृत्यू: ९ एप्रिल २००१)
१९३२: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)
१९४२: अमिताभ बच्चन – चित्रपट अभिनेता व निर्माता
१९४३: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ११ आक्टोबर १९९६)
१९४६: विजय भटकर – संगणकतज्ञ ? ’सी. डॅक’ या प्रगत संगणकीय विकसन केन्द्राचे संस्थापक. ८ ग्रंथांचे लेखन-संपादन व सुमारे ७५ शोधनिबंध यांमुळे त्यांनी संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे?
१९५१: मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
२०१९: साली आंध्रप्रदेश राज्याच्या कुरुनुल या ठिकाणी थर्ड जनरेशन एंटीटैंक गाईडेड मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८८९: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (जन्म: २४ डिसेंबर १८१८)
१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना ’राष्ट्रसंत’ असे संबोधले जाते. ’ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. (जन्म: ३० एप्रिल १९०९)
१९८४: खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (जन्म: २७ जून १९१७)
१९९४: दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
१९९६: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ आक्टोबर १९४३)
१९९७: विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य (जन्म: ? ? ????)
१९९९: रमाकांत कवठेकर – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
२०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)
२००२: दीना पाठक – अभिनेत्री (जन्म: ४ मार्च १९२२)
२००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)