राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा
राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा

हे पृष्ठ 27 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २७ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 27 June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

द. रा. पेंडसे

१९९६ : अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर

१९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

१९७७ : जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

१९५० : अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर

१९३९ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)

१९१७ : खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)

१८८० : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)

हेलन केलर

१८७५ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)

१८६४ : शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

१८३८ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१५५० : चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ३० मे १५७४)

१४६२ : लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ जानेवारी १५१५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

फील्ड मार्शल सॅम माणेकशा

२००८ : फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)

२००० : द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार (जन्म: ? ? ????)

१९९८ : होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)

१९९६ : अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)

१८३९ : महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)

१७०८ : धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: ? ? १६५०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *