५ अप्रैल दिनविशेष - 5 April in History
५ अप्रैल दिनविशेष - 5 April in History

हे पृष्ठ 5 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 5th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६६३: पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.

१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]

१९३०: २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.

१९४९: भारत स्काऊट गाईडची स्थापना

१९५५: प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.

२०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.

१९९९: राष्ट्रीय समुद्री दिवस भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८२७: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)

१८५६: बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)

१९०८: बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू: ६ जुलै १९८६)

१९०९: अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू: २७ जून १९९६)

१९१६: ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता (मृत्यू: १२ जून २००३)

१९२०: डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू: ९ जुलै २००५)

१९२०: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)

१९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१७: शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर (जन्म: ? ? ????)

१९२२: पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९४०: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)

१९६४: गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार (जन्म: ? ? ????)

१९९३: दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)

१९९६: भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक (जन्म: ? ? ????)

१९९८: रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री (जन्म: ? ? ????)

२००२: मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म: ? ? १९४६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *