हे पृष्ठ 6 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ६ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 6 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
-`
महत्त्वाच्या घटना:
१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
१७८५: ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.
१८८५: लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.
१८९२: ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.
१९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना
१९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
१९४४: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हणून संबोधलं.
१९४७: रशियात ए के ४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरूवात झाली.
१९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
२००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
–
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६)
१८३७: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)
१८६२: एल. के. अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)
१८८१: विदर्भातील संत गुलाबराव महाराज (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)
१८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)
१९०१: डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३)
१९०५: लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)
१९१४: डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)
१९२०: डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५)
१९२७: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)
१९३०: डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
१९३५: चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.
१९३९: भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म.
१९४६: जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष
१९४६: अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांचा जन्म.
१९५२: रेखा शिवकुमार बैजल – मराठी साहित्यिक
१९६१: भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.
१९७५: अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.
१९८६: तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६१४: कच्छ प्रांताचे राजपूत राजा व मुघल बादशाहा अकबर यांचे विश्वासू सेनापती राजा मं सिंह यांचे निधन.
१८५४: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)
१९५४: ब्रिटीश कालीन भारतात कायद्याची पदवी ग्रहण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कॉर्नेलिया सोरबजी (Cornelia Sorabjee) यांचे निधन.
१९६२: नोबल पारितोषिक वेजेता प्रख्यात अमेरिकन कादंबऱ्या, लघुकथा, पटकथा, निबंध व नाटक लेखक विलियम फाकनर(William Faulkner) यांचे निधन.
१९८६: ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)
१९९७: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१)
१९९९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९)
२००२: रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी – पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
२००४: ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.