संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका
संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका

हे पृष्ठ 24 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 24 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

थॉमस अल्वा एडिसन
थॉमस अल्वा एडिसन
एडिथ सॅम्पसन
एडिथ सॅम्पसन

१९९१ : युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.

१९६६ : रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले

१९५० : एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.

१८९१ : थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.

१६०८ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

पॉलो कोहेलो
पॉलो कोहेलो

१९४७ : पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक

१९४४ : संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू: २४ जून १९९७)

१९३२ : रावसाहेब गणपराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे तिसरे अध्यक्ष व ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक (२००१ – २००३).

१९२९ : यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक
शिवराम हरी ‘राजगुरू’ – क्रांतिकारक
कल्याणजी वीरजी शाह
कल्याणजी वीरजी शाह

२००० : कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)

१९९३ : शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)

१९२५ : सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.