मार्टिन ल्यूथर किंग
मार्टिन ल्यूथर किंग

हे पृष्ठ 11 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 11 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

महमूद अब्बास

२००४ : यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती

१९८१ : अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९७५ : अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.

१९६२ : कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.

१९४७ : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.

१९४२ : दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री,

१९६२ : डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल

१९४२ : रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)

१९३६ : माला सिन्हा – हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री

१९२६ : बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (मृत्यू: २९ जुलै २००३)

१९२४ : रुसी शेरियर मोदी – कसोटी (मृत्यू: १७ मे १९९६)

राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक

१९११ : गोपाळ नरहर तथा ’मनमोहन’ नातू – ’लोककवी’ (मृत्यू: ७ मे १९९१)

१८८८ : जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (मृत्यू: १९ मार्च १९८२)

१८८८ : मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (१९९२) (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)

१८८६ : श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)

१८७२ : ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (मृत्यू: २७ आक्टोबर १९३७)

१८५१ : राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (मृत्यू: ४ जानेवारी १९०८ – मुंबई)

१८२१ : फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक

२००५ : पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)

२००४ : यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)

१९९९ : अरविंद मेस्त्री – शिल्पकार (जन्म: ? ? ????)

१९९७ : यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते (जन्म: ? ? ????)

१९९४ : कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (जन्म: २९ डिसेंबर १९०४)

१९८४ : मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (जन्म: १९ डिसेंबर १८९९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *