पण्डित मदन मोहन मालवीय
पण्डित मदन मोहन मालवीय

हे पृष्ठ 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 12 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम

२००३ : ’शांघाय ट्रान्सरॅपिड’ या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२००० : १२ नोव्हेंबर हा दिवस ’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.

२००० : भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

१९९८ : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी ‘पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. १५ सप्टेंबर २००२ पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.

जोसेफ स्टॅलिन

१९५६ : मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९३० : पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९२७ : सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

१९१८ : ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

१९०५ : नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक

१९४० : अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (मृत्यू: २७ जुलै १९९२ – मुंबई)

१९०४ : श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: १ एप्रिल १९८९)

डॉ. सलीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ

१८९६ : डॉ. सलीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (मृत्यू: २७ जुलै १९८७)

१८८० : पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

१८१७ : बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १८९२ – आक्रा, इस्त्राएल)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

मधू दंडवते

२००५ : प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (जन्म: २१ जानेवारी १९२४)

१९९७ : वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजी – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी (जन्म: ? ? ????)

१९६९ : इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १३ नोव्हेंबर १८९८)

१९५९ : सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

१९५९ : केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक. केशवराव व बाबूराव याबंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ’मजूर’ हे वृत्तपत्र काढले. (जन्म: ९ मे १८८६)

१९४६ : पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८६१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *