हे पृष्ठ 30 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ३० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 30 August. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१५७४: गुरू रामदास शिखांचे चौथे गुरू बनले.
१६५९: मुघल शासक औरंगजेब यांनी आपला मोठा भाऊ दारा शिकोह यांना फाशी दिली.
१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
१८३५: अमेरिकेतील ह्युस्टन शहराची स्थापना झाली.
१९२८: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य लीग ची स्थापन करण्यात आली.
१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातुन सुटका केली.
१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन ’हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स’ हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१९८४: अमेरिकन अंतराळ यान डिस्कव्हरी ने पहिल्यांदा अवकाशात भरारी केली.
२००९: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रयान-१ मोहीम ही औपचारिकरित्या समाप्त केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१५५९: मुघल सम्राट अकबर यांचा मुलगा जहांगीर ४ यांचा जन्मदिन.
१५६९: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (मृत्यू: २८ आक्टोबर १६२७)
१७२०: व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७९६)
१८१२: ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८६९)
१८१३: ना. धों. ताम्हनकर – लेखक, बालसाहित्यिक (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)
१८५०: काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस (१८८५-१८८९), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२), हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३)
१८७१: अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ आक्टोबर १९३७)
१८८३: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ, त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी ’योगमीमांसा’ नावाचे त्रैमासिक काढले. त्याचे ७ खंड प्रकाशित झाले आहेत. (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ – मुंबई)
१९०३: भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक (मृत्यू: ५ आक्टॊबर १९८१)
१९०४: नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९]
१९२३: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ’शैलेन्द्र’ – गीतकार (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६)
१९३०: वॉरन बफे – अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर
१९३०: दशरथ पुजारी – संगीतकार (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)
१९३४: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (मृत्यू: ५ जुलै २००५)
१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)
१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.
१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)
१९४०: सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १८ डिसेंबर १८५६)
१९४७: नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना …‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे. (जन्म: १ जून १८७२)
१९५२: भारतीय रिजर्व बँकेचे पहिले गव्हर्नर ओसबोर्न स्मिथ यांचे निधन.
१९८१: जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
१९९४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
१९९८: नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
२००३: चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
२००८: प्रसिद्ध भरतीय उद्योगपती व बिर्ला कुटुंबातील सदस्य कृष्ण कुमार बिर्ला यांचे निधन.
२०१४: भारतीय मार्क्सवादी इतिहासकार व आधुनिक भारतातील आर्थिक आणि राजकीय इतिहासातील तज्ञ बिपीन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)
२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)