१ सप्टेंबर दिनविशेष - 1 September in History
१ सप्टेंबर दिनविशेष - 1 September in History

हे पृष्ठ 1 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 1 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • अलिप्त राष्ट्रवादी दिन

महत्त्वाच्या घटना:

१९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.

बॉबी फिशर
बॉबी फिशर
बोरिस स्पास्की
बोरिस स्पास्की

१९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
 

१९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.

१९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.

१९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.

१९५१: अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.

१९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.

१९६१: National Council of Educational Research and Training (NCERT ) ची स्थापना (१ सप्टेंबर १९६१) (राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद )

१९६९: लिबीयात उठाव होऊन हुकूमशहा मुअम्मर गडाफी सतेवर आला.

१९७२: आइसलँडमधील रिकजेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

१९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.

१९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

१९९१: उझबेकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७९५: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १८७२)

१८१८: कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२)

१८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)

कृष्ण नारायण
कृष्ण नारायण

१८९६: अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

१९०८: कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

१९१५: राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९७२). ’दस्तक’ या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन व दिग्दर्शन त्यांचे असून या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. (मृत्यू: ? ? १९८४)

माधव मंत्री
माधव मंत्री

१९२१: माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज

१९३०: भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०१५)

१९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

१९४६: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.

पी. ए. संगमा – लोकसभेचे सभापती
पी. ए. संगमा – लोकसभेचे सभापती

१९४७: साली भारतीय राजकारणी व लोकसभेचे माजी अध्यक्ष तसचं, मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री पी. एम. संगमा यांचा जन्मदिन.

१९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.

१९७६: जेष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर स्मृतिदिन

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

थॉमस जे. बाटा
थॉमस जे. बाटा

१५७४: गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (जन्म: ५ मे १४७९)

१५८१: गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)

१७१५: सलग ७२ वर्षे राज्यकारभार केल्यानंतर फ्रान्सचा राजा १४ वा लुई मरण पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)

१८९३: काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस (१८८५-१८८९), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२), हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्‍न केले. भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)

२००८: थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)

२०१४: स्पॅनडेक्स चे निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९३०)

२०२०: जेर्झी स्काझाकिएल – पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते (जन्म: २८ जानेवारी १९४९)

२०२०: शेखर गवळी – भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) (जन्म: ६ ऑगस्ट १९७५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *