२ सप्टेंबर दिनविशेष - 2 September in History
२ सप्टेंबर दिनविशेष - 2 September in History

हे पृष्ठ 2 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 2 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

१. World Coconut Day
२. Calender Adjustment Day

महत्त्वाच्या घटना:

महात्मा गांधीं
महात्मा गांधीं

१९१६: पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९२०: कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.

१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.

१९४५: व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.

बुला चौधरी
बुला चौधरी

१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

१९५८: हेंड्रिक वरवोर्ड हे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान म्हणून निवडून आले.

१९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.

१९७०: स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

१९७०: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो हे चंद्र मिशन काही कारणास्तव रद्द केले.

१९८७: फिलिप्स कंपनीने पहिल्यांदाच CD Player बाजारात आणले.

१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८३८: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)

१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)

१८७७: फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)

१८८५: भारतीय समाजसुधारक, पत्रकार आणि श्री नारायण धर्म परिपालणाशी संबंधित क्रांतिकारक टी. के. माधवन यांचा जन्मदिन.

प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे
प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे

१८८६: प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस – पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)

१९२४: केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मोई यांचा जन्म.

१९३२: स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२)

१९४१: साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री

साधना शिवदासानी
साधना शिवदासानी

१९५२: जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९५३: अहमदशाह मसूद – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)

१९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.

१९७१: भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.

१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

४२१: कॉन्स्टान्शियस तिसरा (रोमन सम्राट, जन्म: ?).

१३९७: फ्रांसेस्को लांडिनी (इटालियन संगीतकार, जन्म: १३२५).

१५४०: इथियोपियाचा सम्राट दावित (दुसरा) यांचे निधन.

१८२०: ज्यांगकिंग (चिनी सम्राट, जन्म: १३ नोव्हेंबर १७६०).

१८६५: आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन यांचे निधन.

१९२१: अँथोनी फ्रांसिस लुकास (अमेरिकन उद्योगपती, जन्म: ९ सप्टेंबर १८५५).

१९३७: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८६३)

१९४७: प्रसिद्ध भारतीय विद्वान, साहित्यकार व शिक्षणतज्ञ तसचं, अलाहाबाद आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी कुलगुरू अमरनाथ झा यांचे निधन.

वि. स.’ खांडेकर
वि. स.’ खांडेकर

१९६०: डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) या संस्थेचे संचालक, त्यांनी पुणे व मुंबई येथील सर्व स्थावर मालमत्ता संस्थेस देणगी दिली. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविज्ञा विभागातर्फे मिळणाऱ्या प्रतिवार्षिक अनुदानावर संस्थेचा खर्च चालतो. (जन्म: ? ? ????)

१९६४: फ्रांसिस्को क्रॅव्हेरो लोपेस (पोर्तुगालचे १३वे राष्ट्राध्यक्ष, जन्म: १२ एप्रिल १८९४).

१९६९: हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १८९०)

१९७६: गणेश आत्माराम तथा विष्णू सखाराम तथा ‘वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९६८), साहित्य अकादमी फेलोशिप विजेते (१९७०), त्यांनी ‘कुमार’ या टोपणनावाने कविता लेखन तर ‘आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे. त्यांच्या ‘ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. (जन्म: १९ जानेवारी १८९८)

१९७८: फ्रेड जी. मायर (अमेरिकन उद्योगपती, जन्म: २१ फेब्रुवारी १८८६).

१९९०: नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि ‘मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास’ (जन्म: ३ आक्टोबर १९०७)

१९९६: पॅडी क्लिफ्ट (झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू, जन्म: १२ जुलै १९५३).

१९९९: डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्‍नागिरी)

रीनिवास विनायक खळे तथा ‘खळे काका’
रीनिवास विनायक खळे तथा ‘खळे काका’

२००९: आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: ८ जुलै १९४९)

२००१: विश्वातील पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण करणारे दक्षिण आफ्रिकेतील महान हृदय विशेषज्ञ व सर्जन क्रिस्टियन बर्नार्ड (Christiaan Barnard) यांचे निधन.

२०११: रीनिवास विनायक खळे तथा ‘खळे काका’ – संगीतकार, पद्मभूषण (२०१०) (जन्म: ३० एप्रिल १९२६)

२०१४: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन. (जन्म: ७ मे १९४९)

शिरीष पै – कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या.
शिरीष पै – कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या.

२०१७: शिरीष पै – कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या. शिरीष पै यांचे ‘एक तारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘गायवाट’, ‘कस्तुरी’, ‘ऋतुचक्र’ असे अनेक कवितासंग्रह वाचकांनी डोक्यावर घेतले आहेत. ‘लाल बैरागीण’, ‘हेही दिवस जातील’ या कादंबऱ्यांचे लेखनही शिरीष पै यांनी केले आहे. ‘आईची गाणी’, ‘बागेतील जमती’ या बालसाहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. ‘हायकू’ हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. शिरीष पै यांनी सिनेमांचे परीक्षणही केले आहे. नर्गीस, राज कपूर, बलराज सहानी, वसंत देसाई अशा नामवंत कलाकारांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती गाजल्या आहेत. त्या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत.
(जन्म: १५ नोव्हेंबर १९२९)

२०२१: चंदन मित्रा – पत्रकार, ‘द पायोनिअर’ या वृत्तपत्राचे संपादक, राज्यसभा खासदार, भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते. सर्व राजकीय पक्षांतील लोकांशी त्यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांची राज्यसभेतील भाषणे अत्यंत विद्वत्तापूर्ण आहेत. याखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा त्यांचा अभ्यास अफाट होता. त्यांच्या भाषणांत आणि लिखाणात त्याचा चपखलपणे उपयोग केलेला दिसतो.
(जन्म: १२ डिसेंबर १९५५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *