हे पृष्ठ 3 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 3 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.
१९३२: इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.
१९४२: साली जर्मनीने A 4 रॉकेट प्रक्षेपित केलं होत. मानवाद्वारे निर्मित अंतरिक्षात जाणारे हे पहिले यान होते.
१९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.
१९७७: साली भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कैद करण्यात आलं होत.
१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
१९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८९०: साली प्रसिद्ध भारतीय ओडिसी लेखक, कवी, पत्रकार समाजसेवक, सुधारक, इतिहासकार आणि राजकारणी डॉ. लक्ष्मीनारायण साहू यांचा जन्मदिन.
१९०३: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)
१९०७: नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि ‘मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास’ (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)
१९१४: म. वा. धोंड – टीकाकार (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)
१९१९: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)
१९२१: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू: २३ जून १९९६)
१९४७: सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर २०१५)
१९४९: जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक
१९५३: साली प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यालायाचे माजी ४५ वे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा जन्मदिन.
२००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.
२००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म: ८ जून १९३०)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८६७: एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (जन्म: ९ जुलै १८१९)
१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२)
१९२३: साली भारतीय आणि दक्षिण आशियाई महिला चिकित्सक आणि सर्जन तसचं, भारतातील पहिल्या महिला पदवीधरांपैकी एक कादंबिनी गांगुली यांचे निधन.
१९५३: साली भारतीय कायदेपंडित व भारतीय संविधान समितीचे सदस्य दीवान बहादूर सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांचे निधन.
१९५९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक (जन्म: २२ सप्टेंबर १९०९)
१९६६: साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी मासिक ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ इत्यादी मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन.
१९९९: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म: २६ जानेवारी १९२१)
२०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)
२०१२: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६)