जागतिक प्राणी दिन
जागतिक प्राणी दिन

हे पृष्ठ 4 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 4 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक प्राणी दिन

महत्त्वाच्या घटना:

अ‍ॅडॉल्फ हिटलर
बेनिटो मुसोलिनी

१९८३ : नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

१९५७ : सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

१९५९ : सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

१९४३ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

१९४० : ’ब्रेनर पास’ येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९२७ : गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१८२४ : मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अरुण सरनाईक

१९३७ : जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री

१९३५ : अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू: २१ जून १९८४)

१९२८ : ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक

सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका

१९१६ : धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती (मृत्यू: ????)

१९१३ : सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० आक्टोबर २००६)

१८२२ : रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट

१९८९ : ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म: २३ आक्टोबर १९२४)

१९८२ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. (जन्म: १६ आक्टोबर १९०७)
१९६६ : अनंत अंतरकर – ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांचे संपादक (जन्म: १ डिसेंबर १९११)

१९४७ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९२१ : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ’हाच मुलाचा बाप’, ’सन्याशाच्या मुलगा’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे ’सौभद्र’, ’शारदा’, ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

१८४७ : महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

१६६९ : रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म: १५ जुलै १६०६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *