१ डिसेंबर दिनविशेष - 1 December in History
१ डिसेंबर दिनविशेष - 1 December in History

हे पृष्ठ 1 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 1 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक एड्स दिवस

जागतिक एड्स दिन दरवर्षी 01 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना HIV विरुद्धच्या लढ्यात एकत्र येण्याची, HIV ग्रस्त लोकांसाठी पाठिंबा दर्शवण्याची आणि एड्स-संबंधित आजाराने मरण पावलेल्या लोकांचे स्मरण करण्याची संधी प्रदान करतो.

  • एन. सी. सी. दिन

महत्त्वाच्या घटना:

१६४०: २० वर्षापासून स्पेनचे गुलाम असलेल्या पोतुर्गालला स्वतंत्र मिळाले होते.

१८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.

१९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

१९३०: याच दिवशी कोलकत्ता आणि ढाका मध्ये विमानसेवा सुरु झाली होती.

१९४८: एस. एस. आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

१९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.

१९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९६५: भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना

१९७३: पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

आशा भोसले
आशा भोसले

१९८८: जागतिक एड्स दिन.

१९८८: बेनझीर भूट्टो यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली.

१९९१: एड्स जागरुकता दिवसाची सुरुवात झाली होती.

१९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर

१९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित केला.

इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान
इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान

१९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ’डी. लिट. पदवी’ जाहीर

१९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.

२०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.

२००१: ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.

२००८: माजी लोकसभा अध्यक्ष शिवचरण झा यांचे निधन.

२०१५: ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१०८१: लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)

१७६१: मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका (मृत्यू: १६ एप्रिल १८५०)

१८७८: भारतासाठी आपले जीवन अर्पण करणारे विदेशी वंशाचे जॉर्ज अरुंडेल ला जन्म.

१८८५: आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ – १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ – संनिधि आश्रम, नवी दिल्ली)

१८८६: भारताचे प्रसिद्ध पत्रकार आणि समाजसेवक महेंद्र प्रताप यांचा ला जन्म.

उदित नारायण
उदित नारायण

१९०९: बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू: २० मार्च १९५६)

१९११: पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९६६)

१९२४: परमवीर चक्राने सन्मानित भारतीय सेनेतील शैतान सिंग यांचा साली जन्म.

१९५०: भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.

१९५४: प्रसिद्ध समाज सेविका मेधा पाटकर यांचा ला जन्म.

मोहम्मद कैफ
मोहम्मद कैफ

१९५४: भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेते राकेश बेदी यांचा ला जन्म.

१९५५: उदित नारायण – पार्श्वगायक १९११ अनंत अंतरकर – ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांचे संपादक (मृत्यू: ४ आक्टोबर १९६६)

१९६३: अर्जुना रणतुंगा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक

१९८०: मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू

१९६०: भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक शिरिन एम. राय यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी
शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी

१८६६: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (जन्म: ४ जुलै १७९०)

१८८६: इस्त्राईल चे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन यांचे निधन.

११३५: हेन्‍री (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म: ? ? १०६८)

१९७४: उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांचे निधन.

१९८५: शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म: १८ जून १८९९)

१९८८: गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (जन्म: २ आक्टोबर १९०८)

१९९०: विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (जन्म: १८ ऑगस्ट १९००)

२०१५: युनायटेड स्टेट चे प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू जिम लॉस्कुटॉफ यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *