३० नोव्हेंबर दिनविशेष - 30 November in History
३० नोव्हेंबर दिनविशेष - 30 November in History

हे पृष्ठ 30 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 30 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

विन्स्टन चर्चिल
विन्स्टन चर्चिल

विजयी झाल्यावर दोन बोटांनी ’V’ दाखवण्याची पद्धत इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर्वप्रथम लोकप्रिय केली. दुसर्‍या महायुद्धाची घोषणा झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण केले. त्यात इंग्लंडचे अंतिम ध्येय फक्त विजय असेल हे सांगताना त्यांनी आवेशात दोन बोटे उंचावून ‘V’ हे विजयचिन्ह दर्शविले.

महत्त्वाच्या घटना:

१७३१: चीनच्या बीजिंगला झालेल्या भूकंपात एक लाख लोक मरण पावले होते.

१७५९: दिल्लीचा सम्राट आलमगीर द्वितीय च्या मंत्र्याची हत्या झाली होती.

१८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

१९१७: कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना

१९३९: सोव्हिएत युनियन ने सीमा विवादामुळे फिनलंड वर आक्रमण केले होते.

१९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.

१९६१: मध्ये सोव्हिएत युनियन ने कुवैत च्या संयुक्त राष्ट्राच्या अर्जाचा विरोध केला होता.

१९६५: प्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर पिल्लई यांनी दिल्लीला बाहुल्यांच्या संग्रलायाची स्थापना केली होती.

१९६६: बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९९४: आजच्या दिवशी सोमालिया च्या जवळ आशि लॉरो नावाचे एक पर्यटक जहाज आग लागून समुद्रात बुडाले होते.

पु. ल. देशपांडे
पु. ल. देशपांडे

१९९५: ’ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा

१९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार आहे.

१९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.

२०००: मध्ये अल गोर यांनी पुन्हा मतमोजणीची अपील केली होती.

२०००: मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची कलाकार प्रियांका चोपडा मिस वर्ल्ड बनली होती.

२०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

२००२: आय सी सी ने झिम्बाब्वे मध्ये न खेळणाऱ्या देशांवर कारवाई होऊ शकते अशी घोषणा केली.

२००४: बांगलादेश च्या लोकसभेत महिलांसाठी ४५ टक्के राखीव जागेचे विधायक मंजूर झाले होते.

२००८: मध्ये आतंकवादी हल्या नंतर सरकारने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ला स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

२०१३: पाकिस्तान ने सिक्रेट पाकिस्तान नावाचा माहितीपट दाखविल्यामुळे विश्वविख्यात मिडिया बीबीसी च्या प्रसारणावर स्थगिती आणली होती.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

स्मिथसन टेनांट
स्मिथसन टेनांट

१६०२: ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २१ मे १६८६)

१७६१: स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)

जगदीशचंद्र बोस
जगदीशचंद्र बोस

१८५८: जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)

१८३५: मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (मृत्यू: २१ एप्रिल १९१०)

१८७४: विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)

१९१०: कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ (मृत्यू: ९ जुलै १९८४)

१९३१: भारतीय इतिहासकार रोमिला थापर यांचा जन्म.

राजीव दिक्षीत
राजीव दिक्षीत

१९३५: आनंद यादव – लेखक

१९३६: भारतीय पार्श्वगायक सुधा मल्होत्रा यांचा जन्म.

१९४४: हिंदी लेखिका मैत्रेयि पुष्पा यांचा जन्म.

१९४५: वाणी जयराम – पार्श्वगायिका

२०१०: राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९००: ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार (जन्म: १६ आक्टोबर १८५४)

निना रिकी
निना रिकी

१९०९: इंग्रजी आणि बंगाल मध्ये लिखाण करणारे प्रसिध्द लेखक रमेश चन्द्र दत्त यांचे निधन.

१९१५: मध्ये प्रसिद्ध तेलगु साहित्यकार गुरुजादा अप्पाराव यांचे निधन.

१९६७: राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०)

१९७०: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (जन्म: १४ जानेवारी १८८३)

इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान
इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान

१९८९: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)

१९९५: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १६ जुलै १९१४)

२००१: मध्ये जगप्रसिद्ध संगीतकार जॉर्ज हॅरिसन याचं निधन.

२०१२: इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म: ४ डिसेंबर १९१९)

२०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *