International Day of Solidarity with the Palestinian People
International Day of Solidarity with the Palestinian People

हे पृष्ठ 29 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 29 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • International Day of Solidarity with the Palestinian People

महत्त्वाच्या घटना:

डॉ. नेल्सन मंडेला
डॉ. नेल्सन मंडेला
गुलाम मुस्तफा खाँ
गुलाम मुस्तफा खाँ

२००० : शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर

२००० : दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर

१९९६ : नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर

१९६३ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी ‘वॉरन समिती’ नेमली.

प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये
प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये

१९४५ : युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७७ : युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९३२ : जाक्स शिराक – फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती

गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक
गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक

१९२६ : प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (मृत्यू: ३० आक्टोबर १९९६)

१९०७ : गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ’आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (मृत्यू: ७ जून २०००)

१८६९ ; अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (मृत्यू: २० जानेवारी १९५१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती
जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती

२००१ : जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)

१९९३ : जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (जन्म: २९ जुलै १९०४)

१९५९ : ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म: १७ मे १८६५)

जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक
जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक

१९३९ : माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म: २१ जानेवारी १८९४)

१९२६ : कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ’केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म: ? ? १८५२ – टेंभू, सातारा, महाराष्ट्र)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.