२३ मार्च दिनविशेष - 23 March in History
२३ मार्च दिनविशेष - 23 March in History

हे पृष्ठ 23 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

२३ मार्च दिनविशेष

On this page, we will list all historical events that have occurred on 23rd March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • शहीद स्मृती दिन
  • पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन

महत्त्वाच्या घटना:

१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.

१९३१: सॉन्डर्सचा वध करणार्‍या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.

१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत

१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९६५: अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने आपले पहिले अंतरीक्ष यान ‘जैमिनी ३’ च्या साह्याने दोन व्यक्तींना अंतराळात पाठविले होते.

१९८०: प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

१९८६: भारतीय राखीव पोलीस दलातील महिलांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षित करण्यात आले.

१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९: लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.

२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

२०१२: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक पूर्ण करणारे पहिले खेळाडू बनले.

२०१४: युरोपीय संघ आणि अमेरिकेने रुस राष्ट्रावर प्रतिबंध लावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६१४: मुघल बादशाहा शहाजहा आणि मुमताज महल यांची सर्वात थोरली मुलगी जहाँआरा यांचा जन्मदिन.

१६९९: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन बार्ट्राम यांचा जन्म.

१७४९: फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.

१८८०: भारतीय क्रांतिकारक चित्तरंजन दास यांच्या पत्नी स्वातंत्र्यता क्रांतिकारी बसंती देवी यांचा जन्मदिन.

१८८१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.

१८८१: नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.

१८८३: मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, त्यांना कन्‍नड, कोंकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठी, कन्‍नड, बंगाली, पर्शियन, पाली, ऊर्दू, ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)

१८८९: प्रख्यात भारतीय संस्कृत अभ्यासक, कवी, तत्ववेत्ता, व्याकरणकार, बहुपक्षी आणि राजस्थानमधील जयपूरच्या तंत्रज्ञांचे तज्ज्ञ, भट्ट मथुरानाथ शास्त्री यांचा जन्मदिन.

१८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९७४)

१८९८: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)

१९१०: डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक. १९३२ मधे ’मिठाचा सत्याग्रह’ या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते . मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असुनही ‘अंग्रेजी हटाओ‘ ही चळवळ त्यांनी चालविली होती. (मृत्यू: १२ आक्टोबर १९६७)

१९१०: डॉ. राम मनोहर लोहिया.

१९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.

१९१६: हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९१९: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या, राजकारणी तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या खासदार सुभद्रा जोशी यांचा जन्मदिन

१९२६: रविंद्र पिंगे.

१९२३: हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)

१९३१: व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू

१९५३: किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक

१९५४: अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शन चे स्थापक केनेथ कोल यांचा जन्म.

१९६८: माईक अ‍ॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू

१९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.

१९८७: अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९३१: सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.

१९३१: भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)

१९३१: ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म: १५ मे १९०७)

१९३१: शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)

१९६५: भारतीय स्वातंत्र्यता कार्यकर्ता सुहासिनी गांगुली यांचे निधन.

१९८८: पंजाबी भाषिक कवी पाश यांचे निधन.

१९९१: व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९१३)

२००७: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.

२००८: गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म: १९१८?)

२०१०: भारतीय नक्षलवादी चळवळीचे जनक कानू सान्याल यांचे निधन.

२०११: एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *