२४ डिसेंबर दिनविशेष - 24 December in History
२४ डिसेंबर दिनविशेष - 24 December in History

हे पृष्ठ 24 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २४ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 24 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

राष्ट्रीय ग्राहक दिन

दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय ग्राहक दिन National Consumer Day

महत्त्वाच्या घटना:

कॅप्टन जेम्स कूक
कॅप्टन जेम्स कूक

१७७७: कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

१८९२: भारताचे प्रसिद्ध लेखक बनारसीदास चतुर्वेदी यांचा जन्म.

१८९४: पहिली वैद्यकीय परिषद कोलकत्ता येथे सुरु झाली.

१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा

१९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.

१९५१: लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.

१९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.

१९८६: भारतीय ग्राहक दिन.

१९८६: दिल्ली येथील लोटस टेंपल भक्तांसाठी उघडण्यात आले होते.

१९८९: मुंबई मध्ये देशातील पहिले मनोरंजन पार्क ‘एस्सेल वर्ल्ड’ उघडल्या गेले.

१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

२०००: भारतीय बुद्धीबळ खेळाडू विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळातील वर्ल्ड चैंपियनशिप आपल्या नावावर केली.

२००२: दिल्लीच्या मेट्रोचा शुभारंभ झाला.

२०१४: अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.

२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.

पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू
पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

११६६: जॉन – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १९ आक्टोबर १२१६)

१८१८: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)

डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक
डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक

१८६४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)

१८८०: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)

पांडुरंग सदाशिव साने
पांडुरंग सदाशिव साने

१८९९: पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: ११ जून १९५०)

१९२४: मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७) (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)

१९३०: देशातील प्रसिद्ध लेखिका उषा प्रियंवदा यांचा जन्म.

मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री
मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री

१९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)

१९५६: भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म.

१९५७: हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष

९५९: अनिल कपूर – हिन्दी चित्रपट कलाकार

१९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.

१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू पियुष चावला यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी
वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी

१५२४: वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: ?? १४६९)

१९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)

१९७३: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)

पेरीयार ई. व्ही. रामस्वामी
पेरीयार ई. व्ही. रामस्वामी

१९७७: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८)

१९८७: एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७)

१९८८: प्रसिद्ध लेखक जैनेंद्रकुमार यांचे निधन.

१९९३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)

१९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

२०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)

२००५: भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *