हे पृष्ठ 26 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २६ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 26 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
महत्त्वाच्या घटना:
१८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
१९०४: दिल्ली ते मुंबई पहिली क्रॉस कंट्री मोटारकार रॅलीचे उद्घाटन.
१९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.
१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
१९७८: भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जेल मधून सुटका करण्यात आली.
१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार
२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.
२००६: शेन वार्न ने आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये ७०० विकेट घेऊन एक नवीन विक्रम रचला..
२०१२: चीनची राजधानी बीजिंग पासून तर ग्वांग्झू पर्यंत पहिल्यांदा जगातील सर्वात लांब आणि वेगवान रेल्वे रस्ता सुरु केल्या गेला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७१६: १८ व्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी थॉमस ग्रे यांचा जन्म.
१७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८७१)
१७९१: चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू: १८ आक्टोबर १८७१)
१८९३: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू: ९ सप्टॆंबर १९७६)
१८९९: भारताचे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी जनरल डायर वर गोळ्या झाडून जालियानवाला बाग हत्याकांडा चा बदला घेतला अश्या सरदार उधम सिंग यांचा आजच्या दिवशी जन्म.
१९१४: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
१९१४: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)
१९१७: डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
१९२५: पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक (मृत्यू: १३ जुलै १९९४)
१९२९: गुजराती साहित्यिक तारक मेहता यांचा जन्म.
१९३५: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)
१९४१: लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार
१९४८: डॉ. प्रकाश आमटे
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५३०: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)
१९६१: भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक तसेच लेखक भूपेंद्रनाथ दत्त यांचे निधन.
१९६६: पंजाब चे पहिले मुख्यमंत्री तसेच गांधी स्मारक निधी चे पहिले अध्यक्ष गोपी चंद भार्गव यांचे निधन.
१९७२: हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ मे १८८४)
१९८९: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)
१९९९: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)
२०००: प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक (जन्म: ? ? ????)
२००६: कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)
२०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)