१ ऑक्टोबर दिनविशेष - 1 October in History
१ ऑक्टोबर दिनविशेष - 1 October in History

हे पृष्ठ 1 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 1 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

आंतरराष्ट्रीय कॉफी दिन

आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन

आंतरराष्ट्रीय संगीत दिन

  • १ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह

महत्त्वाच्या घटना:

१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू

थॉमस एडिसन
थॉमस एडिसन

१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.

१८६९: साली ऑस्ट्रिया देशांत जगात पहिल्यांदा पोस्टकार्ड चा वापर करण्यात आला.

१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.

१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना

१९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.

१९४६: युनायटेड किंग्डममधे ’मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची ची स्थापना झाली.

१९४९: साली जनरल माओ त्से तुंग यांनी चीन लोकशाही वादी गणराज्य  (पीपुल्स रिपब्लिक आफ़ चाइना) ची घोषणा केली.

१९५३: साली भाषांवर आधारित भारतातील पहिले तेलगु भाषिक राज्य आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली.

भुवनेशप्रसाद सिन्हा
भुवनेशप्रसाद सिन्हा

१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.

१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.

१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.

१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.

२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.

अ‍ॅनी बेझंट
अ‍ॅनी बेझंट

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८४७: अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

विल्यम बोईंग
विल्यम बोईंग

१८८१: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)

१८९५: लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १६ आक्टोबर १९५१)

१९०६: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ आक्टोबर १९७५)

१९१९: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)

ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते
ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते

१९१९: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २०००)

१९२४: जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते

१९२८: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (मृत्यू: २१ जुलै २००१)

१९३०: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)

१९४५: साली भारतीय राजनीतिज्ञ व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

शंकर काशिनाथ गर्गे
शंकर काशिनाथ गर्गे

१८६८: मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा (जन्म: १८ आक्टोबर १८०४)

१९३१: शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (जन्म: १८ जानेवारी १८८९)

१९५९: इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

१९९७: गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) (जन्म: ?? १९६१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *